संभाजी भिडे म्हणजे धगधगते हिंदुत्व आहे. मोदी सरकार आल्यानंतर त्यांच्या वक्तव्याला धार आली आहे. मात्र त्यांचे कुठलेही वक्तव्य वादग्रस्त होत चालले आहे. त्यांचे ताजे वक्तव्य १५ ऑगस्टसंबंधात आहे. भिडे म्हणतात, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी वंदे मातरम म्हणत फासावर लटकून घेतलं ते वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. १८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचलं ” असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते रविवारी पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.
भिडे पुढे म्हणतात, १५ ऑगस्ट हे हांडगे स्वातंत्र्य असलं तरी पत्करले पाहिजे. सबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे, त्या दिवशी कडकडीत उपवास करायचा असेही ते म्हणाले.
भिडे गुरुजी म्हणाले, या वर्षापासून १५ ऑगस्ट या दिवशी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्यदिन साजरा करूया. या दिवशी कडकडीत उपवास करायचा. भगव्या झेंड्याला नैवेद्य दाखवून संध्याकाळी कोरभर भाकरी खायची. जो पर्यंत १५ ऑगस्ट साजरा करतो आहोत तोपर्यंत करायचंच. ज्या दिवशी संबंध देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन दुःखाचाही आहे. हे असं महाराष्ट्र करेल, अन्य राज्यात असा विचार रुजायला वेळ लागेल. दिल्लीवरती भगव्या झेंड्याचंच राज्य पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या ह्या वक्तव्यावर प्रतिक्रिया तर येणारच. हिंदूंना तरी भिडे गुरुजींचे हे विचार मान्य होतील का? तुम्हाला काय वाटते?
60 Total Likes and Views