विश्व कप क्रिकेट….भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला

News Sports
Spread the love

यंदाच्या आयसीसी वन डे विश्वचषक  वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद  वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत  बीसीसीआयने  पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा तब्बल ४६ दिवस भारतातल्या १०  शहरात खेळली जाईल.  ५ ऑक्टोबरला अहमदाबादेत पहिला सामना खेळला जाईल. अंतिम सामना   नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये  १९ नोव्हेंबर रोजी होईल.

       विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

          आधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही हे यातून स्पष्ट होते. याशिवाय पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये खेळायचा आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तीन सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. आता बातमी येत आहे की, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे.

 71 Total Likes and Views

0 Comments

No Comment.