अशोक चव्हाणांची दहशत राष्ट्रीय काँग्रेसची वाताहत :

Editorial
Spread the love

एकदा एका राजाने आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी राजपुत्रासाठी स्वयंवराचा घाट घातला त्यासाठी विविध देशांमधून विविध रूपवती आल्या त्यात एक सिल्क स्मिता सारखी आळोखे पिळोखे खाणा खुणा करणारी नटी पण होती मात्र नटी व्यतिरिक्त आलेल्या इतर देखण्या तरुणींमधूनच राजपुत्र नक्की एकीची निवड करतील अशी जमलेल्यांमध्ये कुजबुज सुरु होती, स्वयंवर सोहळा सुरु झाला आणि राजपुत्र एकेका सुंदरी समोरून त्यांना पारखत निरखित पुढे जात होता शेवटी तो त्या नटी समोर जेव्हा येऊन उभा राहिला, तिच्या अदा घायाळ करणाऱ्या, सेक्सी खाणाखुणा नेमका तिचा पदर त्याचवेळी नको तेवढा अधिक ढळला आणि राजपुत्राच्या तोंडाला पाणी सुटले त्याने त्या नटीला पत्नी म्हणून निवडले पण त्या नटीनेच पुढे अख्या राज्याची त्या राजपुत्राची वाट लावली आणि अख्खे राज्य शेजारच्या राज्याच्या राजाला जो तिचा खरा प्रियकर होता त्यास मिळवून दिले. पती असलेल्या राजपुत्राला पुढे एक दिवस आत्महत्या करावी लागली. माजी मंत्री माजी मुख्यमंत्री राज्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवरून मला हि कथा का आठवली किंवा अशोक चव्हाण हे त्या काँग्रेस मधले कथेतली नटी कसे ते ओघाने पुढे येणार आहे…

पुन्हा एकदा राज्यातले काँग्रेसमधले झाडून सारे नेते मागे पडले आहेत म्हणजे या दिवसात दिल्ली दरबारी, राहुल सोनिया दरबारी ना भाई जगताप यांना किंमत आहे ना अविनाश पांडे यांना, थोडाफार मान त्या बाळासाहेब थोरात यांना आहे पण काँग्रेस सोडून राजकीय सन्यास घ्यावा कि काय कि पक्षांतर करून मोकळे व्हावे हा सिरीयस विचार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात यादिवसात यासाठी वारंवार येतो आहे कि त्यांना केवळ बसायला खुर्ची दिले जाते ते मात्र काही बोलले तर त्यांचे नेते त्यांचे श्रेष्ठी थेट बहिऱ्यांच्या भूमिकेत शिरून मोकळे होतात, जख्खड म्हातारे झालेल्या माणिकराव ठाकरेंची नाही म्हणायला अस्तित्वासाठी धडपड सुरु असते पण अशोक चव्हाणांनी एकदा का बैस म्हटले तर जागेवरून उठायची त्यांच्यात हिम्मत नसते. सुशीलकुमार शिंदे यांची या दिवसातली भूमिका त्यांचा आग्रह मी माझे सोलापूर माझी मुलगी यापुढे संपलेली असल्याने त्यांना भेटावे आणि गार्हाणे मांडावे असे घडत नाही एखाद्या निष्णात जादूगारासारखे ते गायब होतात आणि आवश्यक तेवढे त्यावेळी प्रकट होऊन पुन्हा क्षणार्धात गायब होतात. भाई जगताप हे वास्तवात मुंबईतल्या कामगारांना आजतागायत जोडून ठेवणारे कामगारांवर पकड असलेले काँग्रेसचे नेते म्हणून अध्यक्ष त्यांना केल्या गेले पण हे उद्धव ठाकरे यांना सहन झाले नाही आणि तसेही भाई जगताप यांचे दिल्ली दरबारी वाढलेले वजन अशोक चव्हाण यांना मनातून सहन होत नव्हते त्यांच्या या नाराजीचा अस्वस्थतेचा नेमका फायदा उद्धव ठाकरेंनी उचलला नेमका मेसेज चव्हाणांकडे पास केला आणि भाई जगतापांची विकेट ऐन महत्वाच्या वेळी पडली उडाली…

भाई जगतापांचा गेम अशोक चव्हाणांनीच केला कारण यादिवसात अशोक चव्हाण यांचे वर सांगितलेल्या कथेतल्या नटीसारखे दिल्ली आणि राहुल सोनिया दरबारी पुन्हा एकवार वाढलेले प्रचंड महत्व कथेतल्या त्या नटीसारखे आहे, नटीने जसे राज्य बुडविले नेमके ते तसेच अशोक चव्हाणांच्या हातून घडू शकते आणि त्यानंतर हेच अशोक चव्हाण पक्षांतर करून बुडलेल्या काँग्रेच्या नेत्यांना वाकुल्या दाखवून मोकळे होतील एवढी त्या नटीची कथा तंतोतंत येथे लागू पडते. भाई जगताप बाजूला पडले त्यांचे नेतृत्व वारंवार विधवा होणाऱ्या अभागी तरुणीसारखे आहे म्हणजे एखादी तरुणी एवढी दुर्दैवी असते कि तिचे चार पाच वेळा लग्न होते खरे पण एकतर ती विधवा होते किंवा तिचा नवरा तिला सोडून जातो किंवा तिचा घटस्फोट तरी होतो त्या नटी रेखासारखे भाई जगताप म्हणजे जेव्हा केव्हा भाई मोठे होतील मंत्री होतील उच्च स्थानी बसतील असे त्यांच्या चाहत्यांना वाटते तेव्हा तेव्हा आजवर भाईंचे नेमके नक्की त्या रेखासारखे झालेले आहे. भाई जगताप यांच्यानंतर काँग्रेसमधले स्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. वाचून तुम्हाला धक्का बसला असेल तुमच्या तोंडाचा भला मोठा आ तुम्ही नक्की वासला असेल पण हीच वस्तुस्थिती आहे, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्यास हेच अशोक चव्हाण भाग पाडतील नानांचे पक्षातले वाढलेले महत्व पूर्णतः संपवून ते मोकळे होण्याआधीच धक्कादायक म्हणजे नाना यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे आणि त्या दृष्टीने त्यांचा त्या मंडळींशी त्या नेत्यांशी संपर्क होत असल्याचा माझी माहिती आहे, नाना पटोले हे पुढल्या काही दिवसात बीआरएस पक्षात सामील होण्याची प्रवेश करण्याची खूप, मोठी, दाट शक्यता आहे…

भाई जगताप म्हणजे मुंबईचे गर्दी जमविणारे निवडणुका जिंकून आणणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा दिवंगत साधे मुरली देवरा देखील नाहीत पण भाई आणि नवनिर्वाचित वर्षा गायकवाड या दोघात नक्कीच तुलना नाही म्हणजे भाई यांना मालगाडीची उपमा दिली तर वर्षा त्यांच्यासमोर साधी महापालिकेची घंटा गाडी देखील ठरणार नाहीत त्यामुळे ज्यांनी कोणी म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासारख्या वाटमारू नेत्यांनी हा उथळ निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिक वाटोळे करण्यास मोठा हातभार लावला आहे हे नक्की आहे म्हणजे राज्यातल्या काँग्रेसची अधिक आणखी पूर्णतः वाट लावून नंतर आपणही या पक्षातून बाहेर पडायचे असा जर दूरदर्शी प्लॅन तशी घातकी योजना जर चव्हाण पद्धतीच्या एखाद्या नेत्याची असेल तर त्यांनी घडवून आणलेले हे पाप नक्की नजीकच्या काळात राज्यातल्या काँग्रेसला अडचणीत आणणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे अशोक चव्हाणांच्या खाजगी भेटीत क्षणार्धात घायाळ झाले म्हणून मी प्रत्येकवेळी सांगितलेल्या कथेची तुलना अशोक चव्हाण यांच्याशी केली आहे आणि मल्लिकार्जुन यांनी एखाद्या माशीसारखे भाई जगताप यांना उचलून कोपऱ्यात टाकले त्यांना आणि मुंबईतल्या काँग्रेसला नोव्हेअर केले. वर्षा गायकवाड यांच्या वादग्रस्त आर्थिक व्यवहारांची पुरावे नस्ती उद्धव ठाकरे यांचे खास आशिष मोरे ज्यांचा मागल्या विधानसभेला फार थोड्या मतांनी वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता, त्या मोरे यांच्याकडे तयार आहे, उद्धव ते पुरावे मोक्याच्या वेळी उघड करून मोकळे होतील. वर्षा गायकवाड यांची भूमिका मुंबई अध्यक्ष म्हणून केवळ बघ्याची असेल असे दिसते….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

 125 Total Likes and Views

0 Comments

No Comment.