अमृताची गोडी तुझ्या भजनात

Analysis
Spread the love

आषाढीचा पावन दिवस येण्यापूर्वीच विठुरायाची कृपा झाली आणि महाराष्ट्रभर अमृतधारांचा वर्षाव झाला. निराधार आकाशातून पडणारा पाऊस जगाचा आधार आहे. तो आला तर सगळे प्रश्न सुटतात.. आणि त्याच्या न येण्याने असंख्य संकटांना तोंड द्यावे लागते… शेवटी विज्ञानाने कितीही भरारी मारली तरी निसर्गावरच अवलंबून रहावे लागत आहे. आणि त्यासाठी विठुरायाच्या चरणाशी जावच लागतं आहे. चंद्रभागेला भरपूर पाणी आलं… महाराष्ट्राचे नदी, नाले, धरणं, गावतळी, दुथडी भरून वाहू लागतील… आषाढी ते कार्तिकी आणि कार्तिके ते महाशिवरात्री बरोबर १२० दिवसांचा फरक. या तीन दिवसांचे उपवास ही उपासना आहेच… आणि शरीरशुद्धीही आहे.
आषाढीच्या दिवशी आपण सगळेचजण विठुनामाचा गजर करू या… महाराष्ट्र सुजलाम…
सुफलाम होऊ दे… सर्व जाती-धर्म गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात नांदू दे…
या महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागू नये…
विठुरायाकडे आपली हीच प्रार्थना…

सगळी शब्दाची खटपट… ||
आला ग्रंथाचा शेवट… ||
म्हणून सांगितले सद् गुरु भजन ||

📞

9892033458

 628 Total Likes and Views

0 Comments

No Comment.