१८ जुलैपासून अधिक मास सुरु झाला आहे. दर 3 वर्षांनी धोंडाचा महिना येतं असतो. महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. यंदा तब्बल १९ वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ योगा योग जुळून आला असून २७ जुलैपासून श्रावण अधिक मास सुरु झाला आहे. ह्या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. त्यामुळे मुलगी-जावयाला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात. त्यात जावायाला चांदीचे वाण देण्याची प्रथा आहे. लक्ष्मीला चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात असे सांगितले जाते.
हिंदू पंचांगात महिन्याची कालगणना चंद्र परिक्रमेवर आधारित आहे तर वर्षाची कालगणना सूर्याचे परिक्रमेवर आधारित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. त्याउलट चंद्राला पृथ्वीची परिक्रमा करायला २९.५३ दिवस लागतात. त्यामुळे १२ चंद्राच्या महिन्याचा कालावधी ३५४ दिवसांचा होतो. सूर्य वर्ष आणि चंद्र वर्ष यातले ११ दिवसाचे अंतर कापण्यासाठी अधिक मासाची संकल्पना आणण्यात आली.
प्रचलित आख्यायिकेनुसार, हिरण्यकश्यप नावाच्या एका राक्षस राजाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे, म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व १२ महिन्यांतही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा. तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शास्त्राने मरणार नाही. त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये. ब्रह्माजींनी त्याला असे वरदान दिले. पण हे वरदान मिळताच हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचे समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार (अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह) या रूपात अधिक मासात प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्यांच्या नखांनी संध्याकाळी दारात फाडून ठार केले.
हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो हा काळ आहे. म्हणूनच अधीक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर तीन वर्षांनी परम शुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन उर्जेने भरून जाते असे मानले जाते.
742 Total Likes and Views