सोमय्या नायक नालायक कि खलनायक

Analysis News
Spread the love

18 जुलै च्या सायंकाळी लोकशाही या वृत्त वाहिनीने भाजपा नेते किरीट सोमय्या यांची लैंगिक विकृतीची सीडी दाखवून राज्यात आणि राष्ट्रात एकच खळबळ जरी उडवून दिलेली असली तरी या प्रकारची पुसटशी कल्पना मी त्याच दिवशी सकाळी आणि आदल्या दिवशी तुम्हाला आणि किरीट सोमय्या यांना देखील अनुक्रमे माझ्या व्हिडीओ आणि लिखाणातून दिलेली आहे दिलेली होती, संदर्भ तपासून खात्री करवून घ्या. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षात मी सोमय्या यांच्यावर काहीही कधीही बोललो नव्हतो, लिहिले नव्हते. किरीट सोमय्या यांचा सेक्स व्हिडीओ का बाहेर आला त्यामागे नेमका कोण आहे कोण कोण आहेत त्यावर येथे मला नक्की काही माहिती उघड करायची आहे. माझी आई सर्वश्रेष्ठ तुम्हाला माहित आहे आणि येथेही तिची शपथ घेऊन सांगतो कि अलीकडे काहींही उघड झाले लफडे बाहेर आले किंवा राजकीय खळबळ माजली कि जो उठतो तो थेट त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे सांगून मोकळा होतो, अनेकदा किंवा बहुतेकवेळा त्यात नक्की नेमके तथ्य असते पण यावेळी किरीट यांची हि भानगड किंवा पुढल्या काही भानगडी उजेडात आणण्यात फडणवीस यांचा काडीचाही संबंध नाही, दूरदूरपर्यंत हात नाही किंबहुना एका नेत्याला मागे खेचण्यासाठी दिल्लीतल्या किंवा राज्यातल्या भाजपाच्याच नेत्यांनी हे कुभांड रचल्याचे जे सांगितल्या जाते त्यात देखील अजिबात सत्य नाही तथ्य नाही वास्तव नाही…

अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील हि सेक्स भानगड उघड केलेली नाही किंवा कोणत्याही नेत्यांकडे हे पुरावे नव्हते मात्र लोकशाही वृत्त वाहिनीकडे सदर सीडी कदाचित ठाकरे सेनेच्या एका मोठ्या नेत्यांमार्फत पोहोचण्याची मोठी शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. तो नेता आणि लोकशाही वृत्त वाहिनीचा एक भागिदार त्यादोघांत समसमान व्यवसायामुळे जिवलग मैत्री आहे हे मला अगदी सुरुवाती पासून माहित आहे कारण माझी स्वतःची जेव्हा वृत्त वाहिनी होती तेव्हा या दोघांशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत असल्याने मला तो सेना नेता आणि लोकशाही वाहिनीचा मालक या दोघातल्या जिवलग मैत्रीविषयी चांगले ठाऊक आहे, अर्थात हा विषय येथे अजिबात महत्वाचा नाही तर किरीट सोमय्या यांना नेमके नागडे कोणी केले ते येथे मला विस्ताराने सांगायचे आहे. मित्रांनो, हा बदला अजिबात राजकीय नाही, राजकीय भांडणातून किंवा राजकीय वैमनस्यातून हे सोमय्या प्रकरण अजिबात उजेडात आलेले नाही किंवा उद्या समजा सोमय्या यांचे आणखी काही पुरावे मोठ्या प्रमाणात बाहेर आले तरीही ते ज्या पद्धतीने आज बाहेर आले किंवा उद्या बाहेर येतील त्यालाच म्हणतात गॅंगवॉर थोडक्यात हे वाट्यावरून म्हणजे ‘तेरी साडी मेरे साडीसे सफेद कैसी, या अशा असुयेवरून हे सोमय्या विरुद्ध इतर गँगस्टर असे जीवावर उदार होऊन पेटलेले युद्ध आहे आणि हि तर फक्त सुरुवात आहे, किरीट सोमय्या एकटे त्या सर्वांना पुरून उरणारे असल्याने आज त्यांना नागडे केले कदाचित आणखी काही मोठ्या भानगडी बाहेर येतील पण कालपासून म्हणजे 18 जुलै रात्रीपासून प्रचंड पेटून उठलेले किरीट सोमय्या देखील त्या विरोधी गॅंग मधल्या अनेकांचा खात्मा करून नक्की मोकळे होतील…

जशी अगदी उघड याआधी मी तुम्हाला आणि अप्रत्यक्ष सोमय्या यांना या प्रकारची कल्पना दिलेली होती, हे असे नक्की घडणार आहे किंवा या सेक्स सीडी नंतर देखील अन्य काही प्रकरणात आपल्याला मोठा त्रास होणार आहे याची तब्बल आठ दिवस आधी किरीट सोमय्या यांना कल्पना आलेली होती विशेष म्हणजे हे असे घडणार आहे हे त्यांनी 16 जुलैला मेधा सोमय्या पत्नी आणि दत्तक पुत्र निल सोमय्या यांना देऊन ठेवलेली होती. आपल्याकडे माझ्या विषयी कोणतेही प्रकरण आल्यास त्याची आधी माझ्याकडे शहनिशा करूनच त्यावर पुढले निर्णय घ्या असे देखील किरीट यांनी काही प्रमुख वृत्त वाहिन्यांना कळविले होते पण लोकशाही सारख्या नवख्या वृत्त वाहिनीकडे अशी माहिती येईल आणि ते अशी तेही माझी माहिती उघड करतील, अति आत्मविश्वास असलेल्या सोमय्या यांना अजिबात वाटले नाही आणि त्यांना उघडे करून नागडे केल्या गेले. पूर्वीची मेधा ओक, भवन्स कॉलेज मधली हि एकेकाळची विद्यार्थी परिषदेची पूर्ण वेळ कार्यकर्ती, अतिशय धाडसी आणि अभाविप ची मोस्ट डिवोटी नेता, पुढे महिला प्रिय किरीट सोमय्या यांच्या प्रेमात पडली आणि दोघे विवाहबद्ध झाले. भाजपामध्ये एकाचवेळी पती आणि पत्नीला त्या काँग्रेस सारखे महत्वाची पदे बहाल केल्या जात नाहीत त्यामुळे किरीट सत्तेच्या राजकारणात व्यस्त झाले आणि मेधा यांनी त्यागाची किंवा बाजूला राहण्याची भूमिका घेतली पुढे त्यांनी राजकारणापेक्षा विविध सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकून दिले. किरीट यांच्या या उघड झालेल्या सेक्स व्हिडीओ मुळे मेधा किंवा निल अजिबात डिस्टरब होणार नाहीत किंवा त्याचा कुठलाही विपरीत परिणाम सोमय्या कुटुंबावर होणार नाही, ऑफ द रेकॉर्ड सांगायचे झाल्यास, किरीट यांचा हा असा रंगीन स्वभाव किंवा प्रवास मेधा यांना अगदी सुरुवारीपासून माहित असल्याने त्यांनी आपल्या नवऱ्याला त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारले पत्करले आहे. अर्थात सोमय्या प्रकरणावर मी नक्कीच वेगळी आणि महत्वाची माहिती सांगणार आहे, सोमय्या समाजाची गरज आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

 1,447 Total Likes and Views

0 Comments

No Comment.