मुंबईच्या संघ कार्यालयातील बाबू!

Analysis
Spread the love

मुंबईच्या संघ कार्यालयात एक बाबू नावाचा मुलगा राहत होत. काही दिवसांनंतर त्याला कार्यालयातून काढून टाकण्यात आले. त्याच्या काही दिवसानंतर प. पु. डॉ. हेडगेवारांचा प्रवास मुंबईला होता. डॉक्टरजी आले व त्यांनी विचारले की “तो बाबू नावाचा एक स्वयंसेवक इथे राहायचा तो आता कुठे आहे ??” त्यावर तेथील कार्यकर्त्यांनी उत्तर दिले की “तो उशिरा उठायचा व इथे राहायच्या लायकीचा नव्हता, म्हणून त्याला इथून काढून टाकलं.” डॉक्टरजी थोडा वेळ विचार करून म्हणाले “आता कुठे राहतो तो? त्याला आपण भेटू शकतो का ? त्यावर स्थानिक कार्यकर्ते म्हणाले तो आता फुटपाथवर राहतो. त्याला बोलावून आणतो.” असे म्हणून ते स्वयंसेवक बाबूला बोलवायला गेले.

  थोड्या वेळाने बाबू आला व डॉक्टरजींनी त्याला काहीही न बोलता एकदम घट्ट मिठी मारली. एक मिनिटानंतर बाबूच्या लक्षात आलं की त्याचा खांदा ओला होतोय व त्याने बघितले कि डॉक्टरजींच्या डोळ्यातून पाणी येत होते……!

  कोण कुठला मुलगा. पण त्यासाठी स्वतःच्या डोळ्यातून अश्रू गाळणारे डॉक्टर हेडगेवार…..!

निस्वार्थ भावनेने समोरच्यावर प्रेम करणारे डॉक्टर हेडगेवार……! एक बाल स्वयंसेवक शाखेत येत नाही म्हणून रात्रभर त्याच्या उंबऱ्यावर थांबणारे डॉक्टर हेडगेवार…..!  प्रत्येक स्वयंसेवकाला स्वतःचा भाऊ मानणारे डॉक्टर हेडगेवार……!  ही असते आत्मीयता!!!!

    तोच बाबू पुढे मोठा होऊन संघाचा प्रचारक बनतो, सुप्रसिद्ध गायक बनतो! त्यांचेच नाव *सुधीर फडके*…!!
*25 जुलै रोजी बाबूजींची जन्मशताब्दी सुरू झालीय. त्या निम्मित ही हृद्य आठवण.*

 71 Total Likes and Views

0 Comments

No Comment.