बोरिवलीत शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत . विभाग क्रमांक एक बोरिवली येथील उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
विभागातील प्रमुख नेते दामोदर म्हात्रे, सचिन म्हात्रे, उपविभागप्रमुख सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन शिंपोली येथे करण्यात आले.
याप्रसंगी विभागप्रमुख आमदार प्रकाश, दामोदर म्हात्रे यांनी या सर्वांचे स्वागत केले. त्यांच्यावर कसा अन्याय झाला हे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार कसे डावले गेले याचा कार्यकर्त्यांसमोर पाढाच वाचला.
आपण कंटाळून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज भेटणारे तसेच बाळासाहेबांच्या विचारांच्या, धनुष्यबाण जनकल्याण आणि जनविकास यांचा ध्यास असलेल्या पक्षात आलो आहोत असे प्रवेश केलेले शिवसैनिक यावेळी म्हणाले.
सर्वांना वाव दिला जाईल, महिला युवकांच्या हाताला रोजगार दिला जाईल, शासन आपल्या दारी ही संकल्पना , घेऊन चालणारे हे सरकार आणि मुख्यमंत्री आहेत. यातून जनविकास नक्कीच साधला जाईल, असा विश्वासही प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला.
38 Total Likes and Views