पहा जमतय का? आपल्याच कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी

Analysis
Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने “कुटुंब प्रबोधन” गतिविधी हे काम सुरु केलं आहे. समाजाच्या आचरणात, व्यवहारात, सवयीत चांगला बदल करत कुटुंब संस्था संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. या साठी समाजात आदर्श कुटुंबिक जीवन जगणारी घरे उभी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणजे आपलं घर छान जिव्हाळ्याचे एकमेकांशी नाते असलेले, गप्पा गोष्टी धमाल मजा करणारे आनंदी ठेवणे हे सुद्धा एक सामाजिक काम ठरणार आहे. कारण समाज हा एकमेकांकडून प्रेरणा घेत असतो मग ती चांगल्या वा वाईट कृतीची असेल.

घराघरात काय काय प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे?
यातील जे जमेल ते सुरु करावे –

१) रात्रीचे जेवण घरातील सर्वांनी एकत्र बसून टीव्ही मोबाईल बंद ठेवून करावे.

२) रोज संध्याकाळी सर्वांनी एकत्र प्रार्थना, भजन, नामस्मरण करावे.

३) आठवड्यातून दररोज किमान एकदातरी एकतास घरातल्या सर्वांनी एकत्र घालवावा, त्यात बैठे खेळ, वाचन, आठवड्यातील अनुभवाचे sharing, पुढच्या आठवड्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन (planning), कलांचे सादरीकरण, वगैरे सर्वांचा सहभाग असलेले आनंद देणारे कार्यक्रम.

४) निसर्गचक्राशी सुसंगत अशी जीवनशैली म्हणजे रात्री लवकर झोपणे (१० वाजता) व पहाटे ५ वाजता उठणे (circadian rhythm).

५) १५ दिवसातून एकदा लंघन, उपवास (एकादशी).

६) किमान आठवड्यातून एकदा तरी अभ्यंग तेल लावून स्नान.

७) महिन्यातून एकदा पोट साफ करण्यासाठी औषध (एरंडेल/ त्रिफळा)

८) वर्षातून किमान एकदा किंवा दोन वेळेस (शक्य असल्यास अथवा जमत असल्यास दर तीन महिन्यांनी एकदा) सर्वांनी एकत्र कुलदेवता व अन्य देवदर्शन.

९) स्वभूषा टिकवणे व स्वभाषा शुद्ध बोलणे

१०) स्वभूषा – भारतीय पारंपारिक वेषभूषा सणाच्या दिवशी न चुकता व विशिष्ट महत्वाच्या प्रसंगी/समयी वापरणे.

११) भारतीय भोजन पदार्थ ऋतू चक्र त्यानुसार बदल आरोग्य याबाबत स्वतः समजून घेणे व पुढील पिढीला त्यामागचे शास्त्र (science) सांगणे.

१२) रूढी परंपरा म्हणून ज्या गोष्टी असतात त्यामागील शास्त्र समजून मगच करणे, काळानुरूप आवश्यकता असल्यास बंद केल्या पाहिजेत अशा रूढी परंपरा बंद करणे.

१३) रोज स्नान, व्यायाम, ध्यान यासाठी आग्रह ठेवणे (स्वतः सुरु करून घरातील इतरांना आग्रह).

१४) स्वच्छता कर्मचारी, वर्तमानपत्र दूध वाटप करणारे, भाजी विक्रेते, आदी नियमित आपल्याला भेटणाऱ्यांशी आदराने वागणे, खुशाली विचारपूस करणे, घरातील समारंभ यांचे निमंत्रण देणे.

१५) कुटुंब मित्र बनणे म्हणजे आपल्याला आवडणारी २-४ कुटुंब निश्चित करून सहपरिवार महिन्यातून किमान एकदा त्यांच्या घरी सहज जाणे त्यांना आपल्या घरी बोलावणे, नियमित भेटीतून सुख दुःख वाटता येईल अशी नाती निर्माण करणे.

कित्येक गोष्टी प्रवाहाविरुद्ध पोहोण्यासारख्या आहेत म्हणून प्रयत्न करण्यात पुरुषार्थ आहे. सोपे बदल कोणीही करेल परंतु माझ्या कुटुंबातील चांगले बदल सशक्त हिंदुस्थानची पुढील पिढी/पिढ्या घडवतील आणि समृद्ध भारताचा पाया रचतील अशी दृष्टी ठेवून प्रयत्न करावे लागतील.

वरील पोस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन या आयामाने तयार करून प्रबोधनासाठी पाठवली ही पोस्ट जास्तीत जास्त प्रसारीत करून हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी ही विनंती आहे.

 544 Total Likes and Views

0 Comments

No Comment.