आदित्य ठाकरे नवा वोटर बेस तयार करतील?

Analysis News
Spread the love

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसलीये. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. ठाकरेंनी शिंदेवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील सरकारी रुग्णालयांतील नवजात बालकांचा, रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण ऐरणीवर आहे. सोबतच शेतकरी आत्महत्यांपासून ते गुजरातमध्ये जाणाऱ्या उद्योगांपर्यंतची झालर ठाकरे यांच्या टिकेला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले की, “आमदार असो वा उद्योगपती, सर्वजण गुजरातला जात आहेत. राज्यात उद्योगांबरोबरच शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारनंतर शेतकऱ्यांपर्यंत कोणताही दिलासा पोहोचलेला नाही.” इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासमोर बसून महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलण्याचे आव्हान देतो.”

भाजप मजबूत स्थितीत दिसतोय?

आदित्य ठाकरेंना (Aaditya Thakeray) प्रश्न विचारण्यात आला की, सध्या भाजप खूप मजबूत स्थितित दिसत आहे. त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मोठा पाठिंबा आहे. अशा स्थितीत ठाकरे लोकसभा निवडणूक कशी लढवणार? काँग्रेस आघाडी कमकुवत आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याीतल जनता शिवसेना युबीटीसोबत आहे. त्यामुळेच महायुती सरकार बीएमसी आणि मुंबई विद्यापीठात सिनेटच्या निवडणुकाही घेत नसल्याचं विधान आदित्य ठाकरेंनी केलं. ते ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या दोन पोटनिवडणुकाही झाल्या नाहीत.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या स्तुतीची भिती राहुल गांधींनाही ठेवावी लागेल?

आरोग्य मंत्र्यांच्या जाहिरातीवर प्रश्नचिन्ह

आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांना विचारण्यात आलं की त्यांच्या पक्षातील लोकांनी का सोडलं? यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यांनी जे केलंय ते त्यांना लपायचं होतं. म्हणून ते गेले. ठाकरे यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. पुढील निवडणुकीत भाजप कुणावर टीका करणार? असा सवाल केला. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांची वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात ही त्यांनी दाखवली. यानंतर ठाकरेंनी हल्लाबोल करत म्हटले की, जेव्हा लोक मरत आहेत. नवजात बालकांना उपचार मिळत नाहीयेत. अशात या जाहिराती योग्य आहेत का?

हिंदुत्वावरही प्रश्न

शिवसेना आता पूर्वीसारखी हिंदूत्त्ववादी राहिली नसल्यासंबंधीचा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, “आम्ही हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड केलेली नाही. या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.” ठाकरे म्हणाले की, हिंदू धर्माबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, हृदयात राम असेल तर हातालाही काम हवे. राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने कोणता अध्यादेश आणला याचे उत्तर भाजपकडे नसल्याचं ते म्हणाले. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. २०१८ मध्ये शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याचा दावा ठाकरे यांनी केला. आजच्या भाजपला मित्रांची गरज नाही, असा दावा ठाकरे यांनी केला. त्यामुळे तीन प्रमुख मित्रपक्ष सोडल्याची टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंवर असेल दोरामदार?

आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात नवे राहिलेल नाहीत. मागच्या विधानसभा निवडणूकीत त्यांचं लॉंचिंग झालं. ते मंत्रीही झाले. राज्याच्या विविधी प्रश्नावर ते आघाडीवर दिसले. नंतर सत्तांतर झालं. ढासळत्या शिवसेनेला सावरण्यासाठी आदित्य ठाकेरंनी पुढाकार घेतला. यानंतर शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. हार्डकोअर हिंदूत्त्ववादी शिवसेनेची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पर्यावरणासारख्या विषयावर त्यांनी पुढाकार घेतला. मुंबईत गुजराती मतांना आकर्षित करण्यासाठी ही त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंदूत्त्वाच्या वाटेवरील बेस वोटर जर शिंदेंसोबत गेला तर नवा मतदार शोधावा लागणार आहे. ठाकरे गटानं म्हणनूच आदित्य ठाकरेंना पुढं केलंय.

हर्षद शेजाळ पाटील

 291 Total Likes and Views

0 Comments

No Comment.