राहुल गांधींची थेट लायकी काढली, बापरे! वडेट्टीवार यांनी बदनामी केली

Editorial Uncategorized
Spread the love

जखमी वाघाच्या ढुंगणावर माकड देखील न घाबरता फुंकर मारून मजा घेते, हसून हसून बेजार होते. खंगलेली सिंहीण तिच्या ओठांचा मुका भर चौकात साधा कोल्हा देखील घेतो तद्वत काँग्रेस नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लायकी काढली. ज्यांनी विजय वडेट्टीवार यांना मोठे केले त्या राहुल गांधी यांना एकप्रकारे पप्पू ठरवले. बदनाम केले, शब्दातून नागडे केले. इंग्रजी, हिंदीत भाषणे देवून काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करणारे, भारत जोडो यात्रा काढून काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी धडपडणारे राहुल गांधी यांची इज्जत राज्याचे वादग्रस्त कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घालवली. विशेष म्हणजे, राज्यातील काँगेस नेते वडेट्टीवार यांना जाब विचारत नाहीत आणि देशाचे नेते राहुल गांधी यांची खुलेपणाने पाठराखण सुद्धा एकही नेता करताना दिसत नाही. आपल्या बोलण्याचा भयानक परिणाम होऊ शकतो असे लक्षात आल्यावर वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमे मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या दावणीला आपली निष्ठा बांधलेले महाराष्ट्रातील बटिक पत्रकार व त्यांची वर्तमानपत्रे मॅनेज झाली अशी जाहीर चर्चा आमच्या क्षेत्रात आहे …

मात्र दिल्लीतील इंग्लिश, हिंदी दैनिके व वेबसाईटने विजय वडेट्टीवार किती राहुल गांधी यांच्याबाबत कसे वाह्यातसारखे बोलले ते छापले आहे. त्यामुळे काँग्रेसचा दिल्लीतील नेत्यांचा गट संतापला आहे. भस्मसुराच्या अवतारात असलेले विविध वादग्रस्त व्यवहारात गुंतलेले काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे सोमवारी पुण्यात म्हणाले, “राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत”!! ज्या नेत्याने आपल्याला दोनवेळा विरोधी पक्षनेता बनवले. ज्या नेत्याने आपल्याला मंत्री केले. ज्या नेत्याने आपल्याला उमेदवारी दिली, त्या नेत्याला विजुभौंनी घरचा अहेर दिला. याला म्हणतात भस्मासुर होणे आणि जेथे खाणे तेथे घाण करणे. आजवर राहुल गांधी यांना पप्पु म्हणून सगळे डिवचत होते. त्याला कारण होते, राहुल गांधी यांचे वक्तेपण!! काहीही बोलणे, कोणतीही उदाहरणे देणे, बोलण्यात असंबद्धता असणे अशी सगळी कारणे आहेत. असे असताना राहुल गांधी यांच्या “पप्पुपणावर” त्यांचेच सगेसोबती, ज्यांना राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, नानाभाऊ पटोले आणखी काही बड्या काँग्रेस नेत्यांना डावलून विरोधी पक्षनेते केले. राहुल गांधी यांनी विजय वडेट्टीवर या अचानक नवश्रीमंत झालेल्या netyala असा मान देवूनही विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसश्रेष्ठींचे उपकार न मानता राहूल गांधी यांची लायकी काढली….

लायकी काढल्यावर सर्व मिडियात वडेट्टीवार यांचा व्हिडिओ वायरल झाल्यावर महाराषट्रातील काँग्रेस नेते हातात बांगड्या घालून बसले, मूग गिळून का बसले ?
राहुल गांधी यांची जाहीर लायकी काढणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना अशोक चव्हाण हे पक्षात वरिष्ठ असूनही एक शब्द बोलले नाहीत. एरवी राहूल गांधी यांची बाजु घेवून लढणाऱ्या राहुल ब्रिगेडच्या नेत्या यशोमती ठाकूर चुप्प बसल्या. बाळासाहेब थोरातराहूल गांधी यांची लायकी काढली तरी गप्प आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधी आवडत नाहीत असे दिसते. कोणत्याही नेत्याने वडेट्टीवार राहूल गांधी यांना असे का म्हणाले यावर एक शब्द काढला नाही. राहूल गांधी यांच्यावर आता काहीही बोलले तरी चालणार आहे असेच सांगून टाकल्याचेच दिसते. उठसूट दिल्ली गाठून राहुल गांधी यांचे कान भरणारे काँग्रेसनेते राहुल गांधी यांची लायकी काढणाऱ्या आपल्या नेत्याला साधा जाब विचारू शकत नाहीत. इतकी मिंधी काँगेस कधीच नव्हती. राहुल गांधी यांचा अपमान काँग्रेसनेते कसा सहन करु शकतात, सामान्य कार्यकर्ते मात्र चिडून जाऊन कुजबुज करू लागले आहेत. तडकाफडकी विजय वडेट्टीवर यांची उचलबांगडी व्हावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे …

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

 85 Total Likes and Views

0 Comments

No Comment.