नेत्यांनी केली दुर्दैवी शकले त्यातच नवबौद्ध अडकले :

News
Spread the love

कोजागिरी पौर्णिमा किंवा विविध सार्वजनिक उपक्रम साजरे करतांना आम्ही ब्राम्हण कधीही अजिबात एकत्र नसतो म्हणजे ऋग्वेदी यजुर्वेदी कोकणस्थ कर्हाडे इत्यादी ब्राम्हणांच्या सार्या पोटशाखा हे असे सार्वजनिक उपक्रम वेगवेगळे होऊन साजरे करतात म्हणजे माझे असे राज्यात कितीतरी ब्राम्हण मित्र त्यांच्या कुटुंबात समजा जावई यजुर्वेदी असेल आणि मुलगी कोकणस्थ असेल किंवा सून कऱ्हाड असेल आणि ते स्वतः ऋग्वेदी पोटशाखेतले असतील, रोटी बेटी व्यवहार ज्यांना मनापासून चालतो पण या अशा सर्वजनिक उपक्रमात एकाच कुटुंबातले वेगवेगळ्या पोटशाखेचे बाहेर सार्वजनिक उपक्रम मात्र हमखास आपापल्या पोटशाखेंबरोबर जाणूनबुजून साजरे करतांना दिसतात पण जेथे ब्राम्हणांच्या हिताचे प्रश्न आडवे आले तर हेच ब्राम्हण अलीकडे अनेक संकटांना तोंड देत त्यांना अक्कल आल्याने सारेच्या सदेव नक्की एकत्र येऊन एखाद्या वादग्रस्त मुद्दयांवर बेंबीच्या देठापासून तुटून पडतात विरोधकांना नामोहरम करतात, त्यांच्यात जशी एकजूट असते नेमकी ती तशी नवबौद्ध बौद्धांमध्ये अजिबात बघायला मिळत नसल्याने महाराष्ट्रातला संख्येने प्रचंड मोठा कदाचित संख्येने दुसर्या क्रमकांचा समाज असूनही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला तेवढा एकत्र येतो जमतो पण पुन्हा एकदा तेथून पांगला कि हेच बौद्ध नवबौद्ध बांधव एकमेकांची तोंडे अजिबात बघायला यासाठी तयार नसतात कारण ज्यांनी या समाजात आपापसात शकले पाडली त्या संधीसाधू नेत्यांच्या नाराजीला हे सर्वसामान्य नवबौद्ध बौद्ध जाम घाबरतात त्यातून नेते तेवढे स्वतःचा कदाचित मोठा कायदा करून घेतात पण अख्खा समाज आजही त्यातून होरपळून निघतो आहे, फारसा प्रगत न होता आहे त्याच दारिद्र्यात झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर हलाखीचे जीवन कुंठतो आहे जगतो आहे जगत आला आहे…

कदाचित माझ्या वाक्यांवर तुम्हाला नवबौद्ध बौद्ध समाजाच्या नेत्यांचा नक्की मनापासून राग आणि या समाजाची यासाठी किंव येईल कारण बाबासाहेबांच्या संकल्पनेतून जन्मलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पार्टीचे त्यांच्याच नेत्यांनी आपापसात भांडून एकमेकांशी हेव्यादाव्याचे राजकारण सतत खेळून आपल्या या महाराष्ट्रात तब्बल 72 लहानमोठ्या वेगवेगळ्या गटात रूपांतर करून थोडक्यात नेत्यांनी आपापसात फुटीचे राजकारण खेळून या प्रचंड संख्यने असलेल्या बौद्धांचे नवबौद्धांचे आजतागायत आर्थिक व सामाजिक खच्चीकरण करून इतरांना त्यातून विशेषतः निवडणुकीदरम्यान मोठा फायदा करून दिलेला आहे विशेषतः जे रिपब्लिकन गटात सामील न होता दिवंगत दादासाहेब रुपवते नितीन राऊत एकनाथ गायकवाड पद्धतीने इतर राजकीय पक्षात कायम रमले त्यांनी तर संधी उपलब्ध असूनही नवबौद्धांसाठी फारसे काही सामाजिक फायद्याचे पदरात पाडून घेतले नाही किंवा सत्तेत असूनही सार्वजनिक उपक्रम राबवून त्याचा आजतागायत कोणताही मोठा फायदा समाजासाठी अजिबात करवून घेतलेला दिसत नाही, कुटुंबाची आर्थिक घडी जशी सत्तेत बसलेल्या अशा विविध नेत्यांनी झक्कास बसवून घेतली तसा कोणताही फायदा समाजाचा फारसा झाला नाही, पुढे होईल असेही दिसत नाही. प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे या राज्यातले नवबौद्धांचे मोठे व प्रमुख नेते, आठवले 1990 पासून या ना त्या दाराने सतत सत्तेत बसलेले तसे मोठ्या मनाचे ते असल्याने त्यांच्या समाजाव्यतिरिक्त इतरही जातीचे केवळ स्वार्थातून आठवले यांच्या सभोवताली कायम पिंगा घालतांना दिसतात, पण आठवले यांची देखील तीच मोठी चूक कि समाजासाठी त्यांनी सार्वजनिक उपक्रम उभे केले हे बिगर नवबौद्ध नेत्याप्रमाणे कुठेही एवढ्या सत्तेच्या दीर्घकाळात त्यांच्या हातून घडल्याचे दुर्दैवाने दिसलेले नाही….

www.vikrantjoshi.com

जागोजाग नवबौद्धांभोवताली विविध कामचलाऊ नको तेवढ्या नेत्यांचा विळखा त्यामुळे फाटाफूट मोठ्या प्रमाणावर, विविध राजकीय पक्ष त्यातून विशेषतः निवडणुकांदरम्यान आपापले फायदे करवून घेतात थोडक्यात लबाडीने या समाजाला आपल्या फायद्यासाठी निवडून येण्यासाठी वापरून घेतात आणि त्यांच्यातल्या लोकमान्य नेत्यांना प्रसंगी आमिषे दाखवून नवबौद्ध बौद्धांना आहे त्याच दारिद्र्यात खितपत पडण्यात भाग पडतात. महत्वाचे म्हणजे जशी यांच्यात आंबेडकर आठवले कवाडे इत्यादी नेत्यांना मान्यता आणि लोकप्रियता आहे तेवढीच मान्यता आश्चर्य म्हणजे देवेंद्र फडणवीसांना देखील तोडीस तोड मिळालेली आहे, हे मी नाही माझा अभ्यासू पत्रकार मित्र बंधुराज लोणे याचे तसे सांगणे आहे, फडणवीसांनी या महत्वाच्या संधीकडे दुर्लक्ष अजिबात करता कामा नये. दुर्दैवाने किंवा नेमकी वृत्ती लक्षात आल्याने एकेकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय असलेली राज्यातली काँग्रेस आणि शरद पवार या समाजाच्या नजरेतून पूर्णतः उतरले आहेत, अन्यथा जेव्हा विशेषतः रामदास आठवले हे शरद पवारांना धरून होते त्यादरम्यान नवबौद्धांचा मोठा फायदा वेळोवेळी पवारांना आणि राजीव व इंदिरा गांधी प्रेमातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होत असे किंबहुना विदर्भातली काँग्रेस केवळ नवबौद्धांमुळे हमखास निवडून येत असे पण तेथल्या मतदारांचे ब्रेन वाशिंग प्रकाश आंबेडकर व जोगेंद्र कवाडे यांनी सातत्याने केल्याने आणि आठवले यांनी पवारांकडे कायमची पाठ फिरवल्याने शरद पवार आणि काँग्रेसचे बारा वाजले पण भाजपाने त्याचा खुबीने मोठा फायदा करून घेतला….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

 43 Total Likes and Views

0 Comments

No Comment.