आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा फटकारलं आहे. राहुल नार्वेकरांनी सादर केलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आणि ही सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहतांनी युक्तीवाद केला आहे. तुषार मेहतांनी वेळ वाढवून मागितली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसल्यामुळे सरन्याधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून विधानसभा अध्यक्षांना वेळोवेळी संधी देऊ सुधा ठोस तारीख देण्यात आली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या सुनावणीपूर्वी विधानसभा अध्यक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंतचा वेळ मागितला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळ द्याला नकार दिलेला आहे. तुषार मेहता यांनी वेळ वाढवून मागितला होता. या मागणीला ठाकरे गटाचे वकीलकपिल सिब्बल यांनी जोरदार विरोध केला होता. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यावा लागणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर आमदारांचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घ्यावा तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या बरोबरच्या इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबर पर्यंत घ्यावा. असे निर्देश आता डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत. तसेच डी. वाय चंद्रचूड असेही म्हणाले की अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल.
1,109 Total Likes and Views