यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

Analysis
Spread the love

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण जवळ आला. ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे.  १५ नोव्हेंबरला दिवाळी संपणार आहे. वसूबारसच्या सणाने दिवाळीची सुरुवात होणार आहे.  दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे धनसंचयामध्ये सातत्याने वाढ होत जाते, असे मानले जाते.धनत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सूख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते.  धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा १२ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजा आवर्जून केली जाते. या लक्ष्मी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून ७ वाजून ४७ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले. त्यावेळी, त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले पात्र होते अशी मान्यता आहे. भगवन धन्वंतरींना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. त्यांचा प्रकटोत्सव म्हणून धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने-चांदी, वाहन खरेदी करण्याचे ही विशेष महत्व आहे.

शिवाय, या दिवशी दान केल्याने संपत्तीमध्ये कित्येक पटींनी वाढ होते, अशी देखील मान्यता आहे.

      दिवाळीमध्ये  नरक चतुर्दशीचे विशेष स्थान आहे. ती  १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. मात्र, या तिथीची सुरूवात ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी अर्थात १२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी होणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याचे विशेष महत्व आहे. ही परंपरा आजही पाळली जाते. उदया तिथीमुळे ही नरक चतुर्दशी दिवस १२ नोव्हेंबरला साजरी केली जाईल. नरकचतुदर्शीचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे.

             या वर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनचा दिवस हा एकाच दिवशी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी धान्य, पैसे, लक्ष्मी, गणपती यांची शुभ मुहूर्तावर पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे.

          लक्ष्मीपूजन झाले की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो. या वर्षी हा दिवस १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते. सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. त्यामुळे, पाडव्याचे विशेष महत्व आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा ६ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

         भाऊबीजचा सण हा बहीण-भावासाठी खास असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्याला  समर्पित असणारा सण आहे. हा सण यावर्षी १५ नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल.  भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.

 1,070 Total Likes and Views

0 Comments

No Comment.