सापाच्या विषाची नशा करताहेत लोक?

Editorial
Spread the love

युट्यूबर व ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तो रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून त्यात सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. नोएडातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटकही झाली आहे. यासंदर्भात एल्विश यादवची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण त्या भानगडीत नसल्याचे त्याने म्हटले आहे.


जगभरात नशा करणाऱ्या पदार्थांचे आणि नशा करणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नशा करण्यासाठी जगभरातील अनेक जण विविध प्रकारचे अंमली पदार्थ, अफू, निकोटीन आणि भांग सारख्या गोष्टींचे सेवन करतात. परंतु, आता यामध्ये स्मोकिंग, इंजेक्शन किंवा सापाच्या विषाचीही भर पडली आहे. स्मोकिंग किंवा इंजेक्शनच्या मदतीने ड्रग्सची नशा केली जाते. आता सापाच्या विष घेत आहेत लोक?
सापाच्या विषाची नशा ही वेगवेगळ्या प्रकारची असल्याचे सांगितले जाते. कारण, प्रत्येक सापाचे विष हे वेगळ्या प्रकारचे असू शकते. परंतु, नशेमध्ये सापाचे विष सेवन करण्याचा कल जगभरात सातत्याने वाढत आहे, जे की धोक्याचे आहे.


सापाच्या विषापासून खरच नशा केली जाऊ शकते का? आणि याची सवय लागू शकते का? तर याचे उत्तर हो असे आहे. सापाच्या विषामुळे तुम्हाला नशा होऊ शकते. साप चावल्यानंतर, त्याच्या लक्षणांमधून हे सूचित होते की, काही सापांचे विष हे न्यूरोटॉक्सिक असते. ज्यामुळे, तो साप चावल्यानंतर आपल्याला वेदना जाणवू शकत नाहीत. त्यामुळे, अशा सापांपासून विष काढून त्यापासून नशा केली जाऊ शकते. ही नशा करण्यासाठी सापाचे विष काढले जाते. त्यानंतर, या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी ते इतर घटकांमध्ये मिसळले जाते. जेणेकरून ते आपल्या शरीराला घातक ठरू नये. विशेष बाब म्हणजे अल्कोहोल आणि ड्रग्ज सारख्या इतर मादक पदार्थांपेक्षा हे सापाचे विष अधिक प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. जे लोक हे विष वापरतात किंवा या विषापासून नशा करतात त्यांना एक विचित्र प्रकारचा आनंद आणि हवेत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. शिवाय ३-४ आठवडे त्यांना चांगली झोप येते, यांसारखी लक्षणे दर्शवतात.मूळात नशा करण्यासाठी सापाचे विष वापरणे हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे आहे. कारण, विष हे शेवटी विषच असते. सापाचे विष हे कोणतेही मनोरंजन करणारे औषध नाही किंवा नशा करणारे औषध नाही. साप त्याचे विष हे शिकार करण्यासाठी आणि जी शिकार केली जाते तिला मारण्यासाठी या विषाचा वापर करतो.शिवाय, सापाच्या विषाचे सेवन केल्यावर त्यापासून येणारा मृत्यू रोखण्यासाठी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे, या विषाचे सेवन करणाऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. त्यामुळे समाजाने सावध राहण्याची गरज आहे.

 39 Total Likes and Views

0 Comments

No Comment.