ओबीसींचे भुजबळ मराठ्यांची धावपळ अनेकांच्या मनाचा गोंधळ :

Editorial
Spread the love

मी जोशी असल्याने भुजबळ काका पुतण्याचे उद्याचे भविष्य आज आत्ता याठिकाणी तुम्हाला सांगून मोकळा होतो. श्रीयुत छगन भुजबळ लोकसभेवर कि राज्यसभेवर हे येथे मला नेमके सांगता येणार नाही त्यात लोकसभेची दाट शक्यता, पण पुढल्या पंचवार्षिक योजनेच्या अर्थात अगदी सुरुवातीला भुजबळ दोन्हीपैकी एकेठाकाणी आधी निवडून जातील त्यानंतर ते नक्कीच केंद्रात शपथ घेऊन मोकळे होतील, राज्यात त्यांची जागा पुतणे समीर घेतील, यादिवसात समीर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आहेत, इकडे तिकडे फाजील बाबींकडे त्यांनी अजिबात वेळ न दवडता, रक्तात आणि अंगात भिनलेले स्वतःकडले नेतृत्व गुण भाजपा सहित त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना दाखवावेत, सारेच समीर यांचा काळा इतिहास विसरून त्यांच्यात उद्याचा वाल्मिकी बघतील, छगन भुजबळांच्या राजकीय निवृत्तीपूर्वी समीर रूपाने भुजबळांचा वारसा ते पूर्वीपेक्षा अधिक जोमाने पुढे नेतील, ओबीसींचे बलाढ्य नेते म्हणून आज जसे राज्यात छगन भुजबळांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे, भविष्यात समीर भुजबळ देखील ओबीसींचे तारणहार आणि नेतृत्वात वाकबगार म्हणून पुढे येतील. एकनाथ किंवा श्रीकांत शिंदे असतील किंवा भुजबळ काका पुतणे, अमुक एखादा नेता सभोवताली जे अचानक मश्रुमछाप सवंगडी उभे राहतात, शिंदे किंवा भुजबळ, सभोवतालचे बिलंदर जमा करण्यात दोघेही अपयशी, ललितछाप सवंगडी जवळ घेतले तर कोणत्या थराला जाऊन फार मोठी किंमत मोजावी लागते, हे भुजबळ काका पुतण्यांनी चांगलेच अनुभवले, ते तसे संकट शिंदे पिता पुत्रांवर ओढवू नये म्हणून भुजबळ असतील किंवा शिंदे, क्षणार्धात सावध होऊन पवार काका पुतणे पद्धतिने सभोवतालचे पारखून निरखून घेणे, बदमाशांना खड्यासारखे बाजूला करणे अधिक चांगले…

गेल्या काही वर्षांपासून विशेषतः भुजबळांचा मध्यंतरी सत्तेतला आणि राजकारणातला उतरता कालखंड सुरू असतांना राज्यातले समस्त ओबीसी नेतृत्वाविना सैरभैर झाले होते एकाकी पडले होते मात्र तिकडे भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातले वरकरणी बावळट पण आतून अतिशय चाणाक्ष असलेले नेतृत्व गुण ओळखले आणि फडणवीसांनी आपल्या या नागपूरकर मित्राला, कार्यकर्त्याला मोठी राजकीय ताकद दिली त्यातून राज्यातल्या ओबीसींना नवे नेतृत्व मिळाले, पाठोपाठ छगन भुजबळ सुदैवाने पुन्हा सत्तेत आले, सारी संकटे विसरून जोमाने जोशाने आणि त्वेषाने कामाला लागले, आज समस्त ओबीसींना राज्यात त्यांचे दोन ताकदवान नेते मिळाले आहेत, सुदैवाने बावनकुळे आणि भुजबळ दोघांचे राजकीय पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्या दोघात कमालीचे सख्य आहे, नेमकी हीच संधी म्हणजे भुजबळ आणि बावनकुळेंच्या रांगेत किंवा पंक्तीला येऊन बसण्याची फार फार मोठी संधी आत्ता याक्षणी काँग्रेसच्या त्या विजय वडेट्टीवार यांना देखील चालून आलेली आहे पण एखाद्याशी साक्षात राजकन्या लग्न करायला तयार असतांना जर तो बिनडोक सावंतांच्या राखीमध्येच उद्याची पत्नी शोधत असेल किंवा श्रीखंड पुरीचे आवतन असतांना जर एखादा विटक्या अन्नाची अपेक्षा ठेवत असेल तर अशांसमोर थेट डोके आपटून जसे मोकळे व्हावे ते तसे नेमके वडेट्टीवार यांनी त्या भूमिकेत न शिरता भुजबळ बावनकुळेंच्या पंक्तीला बसून, मतभेद बाजूला ठेवून ओबीसींच्या हृदयात वसून मोकळे व्हावे, सुवर्णसंधी त्यांना चालून आलेली आहे…

एकदा का छगन भुजबळांची सटकली कि बर्या वाईट परिणामांची किंवा कोणत्याही पदाची, फायद्या तोट्याची अजिबात चिंता न करता, जी जबाबदारी त्यांनी मनापासून स्वीकारलेली असते त्यात जीव ओतून ते काम करतात, रस्त्यावर उतरून आंदोलने करतात, समोरचा थेट पहेलवान असला तरी त्याला अंगावर घेतात. आज बाळासाहेब हयात नाहीत अन्यथा त्यांनी भुजबळांच्या थरकाप उडविणार्या प्रसंगांचे तोंडपाठ यथार्थ वर्णन केले असते, नेमके तेच त्या काळातले, शिवसेनेच्या कठीण दिवसतले भुजबळ आज अनेक कित्येक वर्षांनी बघायला मिळताहेत अर्थात भुजबळांनी नेमके जे धाडस बाळासाहेबांच्या सेनेसाठी दाखवले पुढे तीच त्यांची नेमकी धाडसी वृत्ती शरद पवारांनी अनुभवली किंबहुना आधी शिवसेना उभारताना, पुढे नेतांना जे भुजबळ बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अनेकांशी सत्ताधाऱ्यांशी जीवाची बाजी लावून पंगा घेत होते तेच नेमके त्यांनी शरद पवारांना नेतृत्वात देशभर बलाढ्य करतांना केले म्हणूनच पवार पुढे राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय फायदे उकळून मोकळे झाले आणि आज तिसऱ्यांदा भुजबळ पुन्हा एकदा डोक्यावर कफन बांधून त्यांच्या ओबीसींसाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत तेही जीवाची आणि सत्तेची काळजी चिंता पर्वा न करता. तिकडे आतून नेहमीच्या सवयीनुसार थेट शरद पवार भुजबळांच्याच पक्षातल्या काही नेत्यांना काही मंत्र्यांना, भुजबळांवर जहरी टीका करा त्यांना अपमानित करा नामोहरम करा म्हणून उचकवताहेत पण भुजबळ स्थिर आहेत भूमिकेवर ठाम आहेत संयम राखून आहेत कारण अनुभवी भुजबळांना नेमके माहित आहे कि माझे आजचे ओबीसींसाठीचे आंदोलन मला उद्या अधिक मानसन्मान आणि राजकीय स्थैर्य देणारे ठरेल. ओबीसी मराठा आणि भुजबळ हा विषय येथेच संपत नाही….

क्रमश: हेमंत जोशी

 49 Total Likes and Views

0 Comments

No Comment.