जीवनाचं कटू सत्य

News
Spread the love

🏿2 कोटीचा बंगला
🏿त्यात तोंड दिसावं
अशी फरशी
🏿फरशीवर मखमली
गालीचा
🏿नेत्रदिपक रोषणाई
आणि झुंबर
🏿डोळ्याचं पारणं
फिटणारं फर्निचर

आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून “मेल्यावर” तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई
बंगल्यात
झोपायला
मास्टर बेडरूम !
त्यावर लुसलुशीत
गादी !
झगमगीत मँचिंग
बेडशीट !

“शव” दवाखान्यातून घरी आणाल्यावर जुनी-पुराणी लोखंडी खाट, त्यावर फाटकच बेडशीट,कव्हर फाटलेली मळकीच उशी

बंगल्यातल्या
देव्हाऱ्यात चांदीचे
निरंजन, सुगंधी
अगरबत्ती,सुवासिक
धुप….

शवाशेजारी शेवटी लावतात जुनं “पितळच” निरांजन अन् पाच रूपयांचीच “अगरबत्ती”

2 कोटीच्या
बंगल्यात 5 लाखाचं
बाथरूम,त्यात
आंघोळीला टबबाथ,
गरम पाण्याचा शाँवर,
सुंगधी साबण आणि
शांपू,चारी बाजूंनी
आरशे…..

महागडी बाथरूम बांधली तरी !
शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच!

शेवटचा कार्यक्रम
बघा….!
तुमचं आंघोळीचं
पाणीसुध्दा ओलांडू
नये असा
कारभाऱ्यांचा आदेश

आंघोळीचं पाणी तापतयं उघड्यावर,
?”शेवटची” आंघोळ
“रस्त्यावर”
आंघोळीच्या साबणाची
पाच रूपयाचीच वडी!

असं कोणी म्हणत नाही
त्याची शेवटची आंघोळ
शाँवरखाली होऊ देत !
आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे,शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस,
नका महागाईचा आणू
असे होते फर्मान!
मांजरपाटचा तीन बटणी शर्ट,नाडीचाच “लेंगा”,आयुष्यभर घातली हँट,तरी गांधी बाबाचीच टोपी….
असं कोणाला वाटत नाही की जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत,ब्रँडेडच आणा ! त्यानचं कमावलयं !
दारात 40 लाखाची गाडी,त्यावर चालक ड्रेसधारी,ऐटीत बसून पुढे,लोकांना हात हातवारे करी,

४० लाखाच्या गाडीचा
शेवटी तुम्हाला उपयोग शून्य……
स्मशानात जाताना
पालिकेचीच गाडी नि
पालिकेचाच चक्रधारी……..!
असं कोणी म्हणालेलं
मी ऐकले नाही की
आयुष्यभर 40 लाखाच्या गाडीत फिरला, त्यातूनच
स्मशानात घेऊन जा !

राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत,
एकसारखीच “वारी”
चारच खांदेकरी !
आणि
एकच “मडक” धरी !!
एखाद्याच्या वाट्याला “चंदन”
कोणा मिळे “बाभळ”
कुणाच्या नशीबी “तुपाचा” मारा,
कोणावर “पडे” राँकेलचा “फवारा”
रक्षाचा रंग मात्र राखाडी…..!!

स्मशानातलं ठरलेले “डायलाँग” –
काय आहे या जीवनात
मोकळं यायचयं !
मोकळचं जायचयं !!
कोट्यावधी कमावले !
पण
बरोबर काय घेऊन गेला !!

मित्र हो !
मी एवढ्यासाठी हे मांडतोय की माणसानं जरूर कमवावं, माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत !
माणसानं जीवन
सुखा-समाधानानं जगावं,
जीवनातल्या सुखांचा
पुरेपुर आनंद लुटावा !

पण

मालमत्ता ऐवढीही जमवू नये की त्यातून पुढच्या पिढीत वाद-विवाद पेटतील !

माझा बंगला झाला, माझ्या मित्राचा व्हावा, अशी विचारधारा ठेवा….!

अनाथांचे “नाथ” बना !
गोर-गरीबाला मदत करून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करा !
जीवनात एखादं काम असं करा की तुमची पुढची पिढी “याद” करील !
परोपकारी बना !
कमावलेल्या रकमेतली ठराविक रक्कम समाजोन्नतीसाठी खर्च करा !

ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले !
अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस !!
असं मला वाटतयं !
तुम्हाला काय वाटतय देव जाणे !!

वाटले ते मांडले, चांगले असेल मित्रांना पाठवा !

चुकीचं असेल तर मुर्ख म्हणून सोडून द्या….!

मी विव्दान नाही !सरळ-साधा माणूस !
चुकून काही चुकलचं,तर आपुलकीनं माझी जाहीर माफी….!

 85 Total Likes and Views

0 Comments

No Comment.