राजस्थानचे नवे मुख्यमंत्री: मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा भजनलाल शर्मा आमदारांसोबत शेवटच्या रांगेत उभे होते

Uncategorized
Spread the love

राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजस्थानच्या प्रदेश कार्यालयात विधिमंडळ पक्षाची सुरुवातीला बैठक पार पडली. या बैठकीत भाजप हायकमांडने ठरवलेलं नाव जाहीर करण्यात आलं. या नावावर सर्वांचं एकमत झालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनीच नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भजनलाल शर्मा संघाच्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. ते मूळ भरतपूरचे रहिवासी आहेत. ते प्रदेश सरचिटणीसपदावरही होते. आमदारांच्या ग्रुप फोटोमध्ये भजनलाल शर्मा चौथ्या रांगेत बसले होते.

दोन नव्या चेहऱ्यांना संधी

यासोबतच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्री असतील. तर वासुदेव देवनानी विधानसभा अध्यक्ष असतील. भाजपने तीनही मोठी पदे जयपूरलाच दिली आहेत. भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे जयपूरच्या सांगानेर मतदारसंघाचे आमदार आहेत. तर दिया कुमारी जयपूरच्या विद्याधरनगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत, तर प्रेमचंद बैरवा जयपूर जिल्ह्यातील दुडू मतदारसंघातून आमदार आहेत. बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांनी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी बैठकीपूर्वीच वसुंधरा राजे यांची समजूत काढली होती. त्यांनी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी वसुंधरा राजेंना तयार केलं हतं. भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजप नेते सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात पोहोचले.

सबका साथ सबका विकास

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी भजनलाल यांची निवड झाली. या निवडीनंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व नेत्यांसोबत काम करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. सांगानेरमधून आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्या जागी भजनलाल शर्मा यांना रिंगणात उतरवण्यात आलं.

चौथ्या रांगेत भजनलाल शर्मा

राज्य मुख्यालयात बैठकीपूर्वी राजनाथ यांच्यासोबत सर्व आमदारांचे ग्रुप फोटो सेशन झालं. फोटो सेशन दरम्यान वसुंधरा राजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शेजारी बसल्या होत्या. चौथ्या रांगेत भजनलाल शर्मा बसले होते. दिया कुमारी दुसऱ्या रांगेत होत्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडीवरून भाजपने ब्राह्मण, राजपूत आणि दलित यांना संधी दिलीये. ब्राह्मणांना मुख्यमंत्री आणि राजपूत यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने सर्वसामान्यांनाही मोठा संदेश दिला आहे. त्याचवेळी प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. असं करत भाजपने दलितांमध्ये स्वीकृती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यात बेरोजगारांच्या रेकोर्ड ब्रेक आत्महत्या, सीएम शिंदेंच्या भूमिकेवर लक्ष!

आरएसएससाठी काम केलं

भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी राज्यशास्त्राता एमए पुर्ण केलं आहे. ते राजस्थान विद्यापीठाचे विद्यार्थी होते. बऱ्याच वर्षांपासून ते संघात काम करत आहेत. संघटना वाढवण्यासाठी त्यांचे परिश्रम फळाला आल्याचं बोललं जातंय. यावर्षी पहिल्यांदाच ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले. पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळालीये.

संपत्ती

भजनलाल शर्मा यांच्याकडे १.४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर ३५ लाख रुपयांचे कर्ज आहे. शिवाय १,१५,००० रुपयांची रोकड त्यांच्याकडे आहे. त्यांनी दिलेलेल्या प्रतिज्ञापत्रात या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. तर ११ लाख रुपये बँकेत जमा आहेत. तीन तोळे सोने त्यांच्याकडे आहेत. शिवाय एलआयसी आणि एचडीएफसी या दोन वीमा पॉलीसी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे एक टाटा सफारी आणि टिव्हीएसची व्हिक्टर बाईक आहे.

 54 Total Likes and Views

0 Comments

No Comment.