टीव्हीएस ने टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० नागपूर मध्ये केली लाँच

Lifestyle
Spread the love

नागपूर, डिसेंबर १८, २०२३: टीवीएस मोटर कंपनी  ने आज नागपूर येथे टीव्हीएस अपाचे  आरटीआर  ३१० लाँच केली आहे. ही बहुप्रतिक्षित नेक्‍ड स्पोर्टस् मोटरसायकल शक्‍ती, गतीशीलता व स्‍टाइलच्‍या प्रभावी संयोजनासह दुचाकी राइड करण्‍याच्‍या उत्‍साहाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास, तसेच जगभरातील मोटरसायकल उत्‍साही व साहसी राइडची आवड असलेल्‍या राइडर्सचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. ही मोटरसायकल अद्वितीय राइडिंग अनुभव देते, तसेच नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यासह फ्रीस्‍टाइलर क्षेत्रात गेटवे प्रदान करत आहे. 

टीव्हीएस अपाचे  आरटीआर  ३१० अद्वितीय डिझाइन, इंजिन लेआऊट, हीट मॅनेजमेंट आणि राइडर सहभाग, सुरक्षितता व आरामदायीपणावर लक्ष केंद्रित असलेल्‍या अनेक वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञानांसह नाविन्‍यतेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे.

लाँचप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टीवीएस मोटर कंपनी बिझनेस – प्रिमिअमचे प्रमुख विमल सुंबली म्‍हणाले, टीव्हीएस अपाचे  आरटीआर  ३१० पहिली न्‍यू जनरेशन अपाचे   आहे, जिच्‍यामध्‍ये ४० वर्षांचा रेसिंग वारसा समाविष्‍ट आहे आणि आमच्‍या ‘ट्रॅक टू रोड’ तत्त्वावर आधारित आहे. आम्‍हाला आज महाराष्‍ट्रात ही मोटरसायकल लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. ही मशिन रोमांच व धमालच्‍या मुलभूत तत्वासह फ्रीस्‍टाइल परफॉर्मन्‍स मोटरसायकलिंगच्‍या नवीन युगाचा शुभारंभ करेल. अनेक सर्वोत्तम तंत्रज्ञानांसह ही प्रमुख अपाचे  इतर प्रत्‍येक अपाचे  प्रमाणे विभागासाठी नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यास तंत्रज्ञानाचे नेतृत्‍व करेल. या मोटरसायकलमधील सायबोर्ग प्रेरित स्‍ट्रीटफायटर डिझाइन, ऑल रेंज टॉर्क आणि ट्रॅक ट्यून अॅजिलिटी आधुनिक राइडर्ससाठी मोटरसायकलिंगचा उत्‍साह धमाल करतात – पॉवर टू प्‍ले फॉर द फ्रीस्‍टाइलर

टीव्हीएस अपाचे  आरटीआर  सिरीजने प्रिमिअम लाइफस्‍टाइल विभागातील नेक्‍ड फॉर्मेटमध्‍ये लक्षणीय छाप निर्माण केली आहे. टीव्‍हीएस अपाचे सिरीजने नुकतेच जागतिक स्‍तरावर ५ दशलक्ष युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा पार केला आहे, ज्‍यामुळे हा विभागातील झपाट्याने विकसित होणारा प्रिमिअम मोटरसायकल ब्रॅण्‍ड बनला आहे.

टीव्हीएस अपाचे  आरटीआर  ३१० मध्‍ये ग्राहकांना निवडण्‍यासाठी १२ विशेष फ्रीस्‍टाइलर अॅक्‍सेसरीजसह नकल गार्ड, वायजर, पॅनियर व टॉप बॉक्‍स किट आणि १४ सेफ्टी गिअर्स व लाइफस्‍टाइल मर्चंडाइज आहे. मोटरसायकलसोबत वार्षिक मेन्‍टेनन्‍स करारांच्‍या माध्‍यमातून २४x७ रोडसाइड असिस्‍टण्‍स व सहजसाध्य सर्विसिंग मिळते.

टीव्‍हीएस अपाचे आरटीआर ३१० आकर्षक किमतीसह अर्सेनल ब्‍लॅक (डब्‍ल्‍यू/ओ क्विकशिफ्टर (₹ २,४२,९९० ) , अर्सेनल ब्‍लॅक (₹ २,५७,९९० ) आणि फ्यूरी येलो (₹ २,६३,९९० )  प्रमाणित एसकेयू आणि बीटीओ (बिल्‍ट टू ऑर्डर) :  डायनॅमिक किट (₹ १८,००० ) , डायनॅमिक प्रो किट (₹ २२,०००) आणि  सेपांग ब्‍ल्‍यू (₹ १०,००० ) कस्‍टमायझेशन्‍समध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे

 72 Total Likes and Views

0 Comments

No Comment.