महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात; 29 डिसेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक

Editorial
Spread the love

महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलं आहे. जागावाटपासंदर्भात ज्येष्ठ नेत्यांची सध्या दिल्लीत खलबतं सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात देखील महत्त्वाची चर्चा झाली आहे.

ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झालं आहे. ताकद कमी असलेल्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली आहे.

जागावाटपासंदर्भात येत्या २९ डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. मेरिटच्या आधारावर जागावाटप ठरेल अशी माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे. मधल्या काळात जो आढावा घेतला आहे, तो सगळा रिपोर्ट सादर केला जाईल, असंही पटोले यांनी म्हटलं.

शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढेल, असा आकडा खासदार संजय राऊत यांनी जाहीर केला आहे. तर काँग्रेसला किमान २४ जागा लढायची इच्छा आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाने यासंदर्भात कोणताही आकडा अद्याप नमूद केलेला नाही, जिंकेल त्या पक्षाला उमेदवारी, असे या पक्षाचे मत असल्याचे बोलले जाते आहे.

 30 Total Likes and Views

0 Comments

No Comment.