२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिर उदघाट्न

Editorial
Spread the love

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिर उदघाट्नाचा अभूतपूर्व असा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्रजीसह १६ भारतीय भाषांत श्रीराम मंदिर मंत्र गीत बनवले आहे. त्यातले मराठीतले गीत खाली देत आहे. आपण सर्व मराठी जनांनी जमल्यास हे गीत पाठ करावे. आणि मुख्य म्हणजे आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी व इतर सर्व गटात हे गीत जास्तीत जास्त पाठवावे ही विनंती.

महामंत्र हा नवविजयाचा,
नव्या युगाचा नव पर्वाचा
दाही दिशातुनी घुमते नाम,
रामप्रभूचे सुंदर नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥धृ.॥

नवे पर्व हे हिंदुत्वाचे,
संघशक्तीचे शिवशक्तीचे
हिंदू मनाचा स्वामी राम,
गंगेसम हे पवित्र नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥१॥

धर्म राखूया इथे निरंतर
खलप्रवृत्ती नुरो धरेवर
पुरुषार्थाचे मंगलधाम
रामप्रभूचे सुंदर नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥२॥

जीर्ण जातसे जेव्हा जळूनी,
नवे येतसे सहज उजळूनी
छत्रपतींच्या स्वप्नांतले
हिंदूंचे हे सुवर्णयुग ये,
मुखी घेऊनी पवित्र नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥३॥

मंदिर बांधले जन्मभूमीवर,
पराक्रमाने विशाल सुंदर
नवविजयाचा मार्ग दाखवील,
जनशक्तीचा मंत्र महान ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥४॥

लोकशाहीचा आद्य प्रणेता,
सुजनशक्तिचा भाग्यविधाता
हिंदू युगाचा नायक राम,
हिंदूंचा हा पंचप्राण ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥५॥

 88 Total Likes and Views

0 Comments

No Comment.