आयोद्धेतील श्रीराम विमानतळाचं पंतप्रधान मोदी असं करणारते उद्घाटन !

News
Spread the love

भारतीयांसाठी २२ जानेवारीची तारिख महत्त्वाचीये. कारण या दिवशी श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा रामजन्मभूमी आयोद्धेतील मंदिरात होणारंय. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ३० डिसेंबरला अयोध्येला भेट देतील. पंतप्रधान २ तास अयोध्येत राहतील. पंतप्रधान मोदी आयोद्धेतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ आणि अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. याशिवाय ते ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणारेत. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे अभिषेक दिनाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआयपी पाहुण्यांना घेऊन सुमारे १०० विमाने अयोध्येत येतील. आज शुक्रवारी पहिल्यांदाच अयोध्येतील भगवान श्री राम विमानतळावर विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आलीये. तिथं २२०० मीटरच्या धावपट्टीवर हवाई दलाचे विमान उतरलं. नागरी विमान वाहतूक अधिकारी या विमानाने अयोध्या विमानतळावर पोहोचले. राम मंदिर ट्रस्टनं अभिषेकासाठी देशातच नव्हे तर परदेशातही निमंत्रणं पाठवलीयेत. अनेक देशांचे प्रतिनिधीही येण्याची शक्यता आहे. याशिवाय ट्रस्टनं मुकेश अंबानी, गौतम अदानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या १००हून अधिक व्हीव्हीआयना आमंत्रणं पाठवलीयेत. बहुतांश व्हीआयपी त्यांच्या खाजगी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने या विमानतळावर उतरतील.

अशी आहे दौऱ्याची रुपरेषा

दिल्ली ते अयोध्येला पहिले विमान ३० डिसेंबरला सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी १० वाजता उड्डाण करेल. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने तयारी केली आहे. या उड्डाणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १२ वाजता अयोध्येला पोहोचतील. त्याचं विमानही या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळावर उतरणार आहे. विमानतळासमोर पंतप्रधानांच्या भाषणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तिथं सुमारे २ लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. यानंतर ते जनतेला संबोधित करतील. पुढं ते अयोध्या रेल्वे स्थानकावर जातील. उद्घाटनानंतर पंतप्रधान रामलला आणि हनुमानगढीला भेट देतील.

५ किमी लांबीचा उड्डाणपूल

अयोध्येत सुमारे ३३ हजार कोटी रुपये खर्चून २३२ योजनांवर काम सुरूये. यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकाला जोडणारा ५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल. दुसऱ्या प्रकल्पात अयोध्येचा सुमारे १५ किलोमीटरचा परिसर विकसित केला जात आहे. याशिवाय, डीपीआर म्हणजेच अयोध्या कॅंटच्या विकासासाठी ६०० कोटी रुपये आणि अयोध्या रेल्वे स्टेशनच्या विस्तारासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांच्या योजनांचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर तिथं ही काम सुरू होईल. रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि राणी हो पार्कचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान पदावर आल्यापासून मोदींचा ३० डिसेंबरला हा तिसरा दौरा आयोद्धा असेल. ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान मोदींनी सर्व विरोधक व टिकाकारांकडे दुर्लक्ष करत अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन केलं होतं. यानंतर ते २०२२ च्या दीपोत्सवासाठी अयोध्येत आले आहेत.

योगी २० दिवसांत दुसऱ्यांदा अयोध्येत

पंतप्रधानमोदींच्या (PM Narendra Modi) अयोध्येत दौऱ्यापुर्वी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी यांनी गुरुवारी राम नगरीला भेट दिली. योगींनी श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या बांधकामाची प्रगती पाहिली. मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या ट्रस्टचे अभियंते, अधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रगती अहवाल जाणून घेतला. यानंतर योगी मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहणी करण्यासाठी पोहोचले. सीएम योगी २० दिवसांत दुसऱ्यांदा अयोध्येला पोहोचले. विमानतळावर फिनिशिंगचे काम सुरू आहे. विमानतळाची पाहणी केल्यानंतर योगींनी जाहीर सभेच्या ठिकाणाचाही आढावा घेतला. यानंतर योगींनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे ३० डिसेंबरपूर्वी पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिलेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या लोकांची सोय लक्षात घेऊन योगींनी हॉटेल्समध्ये आधीच केलेली बुकिंग रद्द करण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेत.

 86 Total Likes and Views

1 Comments
Fake Mail December 25, 2023
| | |
Nice post. I learn something totally new and challenging on websites