पाकिस्तानात इंडियन टीम पाठवणं शक्य नाही, श्रीलंकेत होणार एशिया कप!

News Sports
Spread the love

शनिवारी भारत पाकिस्तान (Indian vs Pakistan) हे संघ एशिया कपमध्ये (Asia Cup)भिडणार होते. भारताची पुर्ण फलंदाजी झाली. ४८.५ ओव्हर्समध्ये २८० रन्स भारताने केल्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानची फलंदाजी झालीच नाही. प्रेक्षकांची निराशा होते. विक्रमी प्रेक्षक लाभणारा सामना रद्द झाला. याचा परिणाम पुढच्या सामन्यावर होवू नये म्हणून सावधानतेची पावलं उचलली जातायेत. एशिया कप २०२३ मधील सुपर-४ स्टेजचे सामने कोलंबोहून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होऊ शकतात. सध्या कोलंबोमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीये. सामने श्रीलंकेच्या कॅंडी किंवा डंबुला शहरात होऊ शकतात. अंतिम आणि सुपर-४ टप्प्यातील ५ सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. एशिया कप स्पर्धेतील सुपर-४चा टप्पा ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये पार पडणार आहे, तर उर्वरित सामने कोलंबो येथे होणार आहेत.

कोलंबोमध्ये सतत पाऊस पडत

एशियाई क्रिकेट परिषदेच्या(Asia Cup) (एसीसी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे पाहता कोलंबोमध्ये होणारे सुपर-४ टप्प्याचे सामने इतरत्र आयोजित केले जाऊ शकतात. सुपर-४ टप्प्यातील पहिला सामना ९ सप्टेंबरला कोलंबोमध्ये होईल, त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत शहरात आणखी ४ सामने होतील. एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला कोलंबोत होणार आहे.

१० सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता
कोलंबोमध्ये रविवारी दिवसभर पाऊस पडला. Accuweather वेबसाइटनुसार, सोमवार ते पुढील रविवार (10 सप्टेंबर) शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मैदानी क्रीडा क्रियाकलापांची शक्यता संपुष्टात येईल.

डंबुला आणि कॅंडी येथे सामने होऊ शकतात

एशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) कोलंबोतील पाऊस लक्षात घेऊन सामन्याचे ठिकाण बदलण्याचा विचार करत आहे. कँडी आणि डंबुला येथे सुपर-४ सामने होऊ शकतात. कॅंडीमध्ये आतापर्यंत २ ग्रुप स्टेज मॅच खेळल्या गेल्यात. श्रीलंका-बांगलादेश सामना बरोबरीत सुटला, तर भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. आता या मैदानावर भारत आणि नेपाळ यांच्यातील गट टप्प्यातील सामना ४ सप्टेंबरला पडतोय. त्यावरही पावासाचा धोका आहे.

सुपर-४ मध्येही भारत-पाकिस्तान सामना अपेक्षित

कॅंडी येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दोन्ही संघ आता सुपर-४ टप्प्यात पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. पाकिस्तान ३ गुणांसह सुपर-४ साठी पात्र ठरला आहे. टीम इंडियाने नेपाळविरुद्धचा सामना जिंकला तर टीम सुपर-४ मध्ये पात्र ठरेल. पावसामुळे दोघांमधील सामना अनिर्णित राहिला तरीही भारत २ गुणांसह सुपर-४ मध्ये पात्र ठरेल, कारण नेपाळ सध्या शून्य गुणांसह गट-अ मध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.

१० सप्टेंबरला पुन्हा भिडणार भारत- पाकिस्तान

वेळापत्रकानुसार पात्रता ठरल्यानंतर सुपर-४ मधील भारताचा पहिला सामना फक्त पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना सध्या १० सप्टेंबरला कोलंबोच्या मैदानावर होणार आहे. सुपर-४ मधील भारतीय संघाचे उर्वरित २ सामने १२ आणि १५ सप्टेंबरला होणार आहेत, मात्र हे सामने कोणत्या संघासोबत होणार आहेत, हे गट-ब चे सर्व सामने आटोपल्यानंतरच निश्चित होईल.

भारतामुळेच श्रीलंकेत सामने

भारतामुळेच श्रीलंकेत एशिया कपचे सामने आयोजित करण्यात आलं. एशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं, संपूर्ण सामने केवळ पाकिस्तानमध्येच होणार होते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजकीय कारणांमुळे आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला.

भारताच्या समस्येमुळे एशिया कपातील ४ सामने पाकिस्तानला ९ सामने श्रीलंकेला देण्यात आले. पाकिस्तानात सध्या उन्हाळा आहे, तिथे पाऊस पडत नाही. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातही सूर्यप्रकाश पाहायला मिळाला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील लाहोरमधील सामनाही पावसाशिवाय खेळला गेला.

 62 Total Likes and Views

0 Comments

No Comment.