Virender Singh Yadav: पुनियानंतर आणखी एका कुस्तीपटूने पद्मश्री पुरस्कार केला परत

News Sports
Spread the love

Virender Singh Returned Padma shri Award:


ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड होताच ऑलंपिक पदक विजेते खेळाडू निषेध व्यक्त करताना दिसून येत आहेत.

शु्क्रवारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारत सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. आता २००५ उन्हाळी डेफलिंपिक सुवर्णपदक विजेता विरेंदर सिंग यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.

संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली याचा विरोध करण्यासाठी विरेंदर सिंग देखील बजरंग पुनियाच्या पावलांवर पाऊल ठेवलं आहे. त्यांनी पद्मश्री पुरस्कार भारत सरकारला परत केलं आहे. विरेंदर सिंग हे गूंगा पहलवान या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांना मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

साक्षी मलिकचा कुस्तीला कायमचा रामराम..

गेल्या काही महिन्यांपासून ब्रिजभूषण सिंग आणि कुस्तीपटूंमध्ये वाद सुरु आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूकीचा निकाल समोर आला असून, संजय सिंग यांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर कुस्तीपटूंमध्ये नाराजी पसरली आहे. हा निकाल समोर येताच साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत, कुस्तीला कायमचा रामराम ठोकला.

 75 Total Likes and Views

1 Comments
Free Temp Mail December 31, 2023
| | |
I do not even know how I ended up here but I thought this post was great I do not know who you are but certainly youre going to a famous blogger if you are not already Cheers