Dunki Vs Salaar: ‘डंकी’ अन् ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर ‘कांटे की टक्कर’; बॉलिवूडचा ‘किंग’ कोण?

Entertainment News
Spread the love

Dunki Vs Salaar

सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘डंकी’ची आणि प्रभासच्या ‘सालार’ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. किंग खानचा ‘डंकी’ २१ डिसेंबरला रिलीज झाला असून प्रभासचा ‘सालार’ २२ डिसेंबरला रिलीज झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे ? आणि कमाईच्या बाबतीत कोणता चित्रपट अव्वल आहे, चला तर जाणून घेऊया…

किंग खानचा ‘डंकी’ २१ डिसेंबरला तर प्रभासचा ‘सालार’ २२ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सेलिब्रिटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ने दोन दिवसांत जगभरामध्ये, ५८ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. खरंतर २०२३ हे वर्ष किंग खानसाठी खूप खास ठरलं आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’ नंतर किंग खानचा ‘डंकी’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या दोन्ही चित्रपटांनी केलेली पहिल्या दिवसाची कमाई पाहता ‘डंकी’ने त्याच्या आर्धी सुद्धा कमाई केलेली नाही.

इतर दोन चित्रपटांप्रमाणेच ‘डंकी’कडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण तसं काही घडलं नाही. किंग खानने घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची चर्चा होती. पण चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. रेंगाळणारे चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा गंडलेला अभिनय यामुळे चित्रपट कदाचित कमाईमध्ये मागे पडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डंकी’ हा कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करीत असून शाहरुख खानसह तापसी पन्नू, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर, बोमन ईरानी आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट म्हणजे, सालार. प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘जवान’, ‘पठान’, ‘गदर २’ आणि ‘ॲनिमल’चा रेकॉर्ड ब्रेक केला. प्रभाससाठी ‘सालार’ चित्रपट खूप महत्वाचा ठरला. प्रभास आपल्या अभिनयामुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रचंड ट्रोल झाला होता. आता ‘सालार’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रभासने सर्वांचीच बोलती बंद केली. प्रभासच्या दमदार अभिनयाने आणि अफलातून ॲक्शनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केल्यामुळे प्रभासचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.

दिग्दर्शक प्रशांत नील यांची चित्रपट बनवण्याची स्टाईल, चित्रपटाचे कथानक, अंगावर शहारे आणणारे ॲक्शन सिक्वेन्स आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या कारणांमुळे बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये हा चित्रपट यशस्वी घोडदौड करीत आहे. ‘सालार’ हा पॅन इंडिया चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डीसह अनेक कलाकार आहेत. (Entertainment News)

 62 Total Likes and Views

0 Comments

No Comment.