संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार कोण?

Editorial
Spread the love

सध्या देश आणि राज्य स्तरावरील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष युती, आघाड्यांची मोर्चेबांधणी करत आहेत. उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचे सत्र सुरु आहेत. सध्यातरी देशात सत्ताधारी एनडीए विरुद्ध विरोधकांची इंडिया आघाडी असा सामना होण्याची शक्यता आहे. एनडीएच नेतृत्व भाजपाकडे तर इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. महाराष्ट्राची राजकीय स्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात फूट पडली आहे. एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधी पक्षात आहे, उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांचा ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवू शकतो. त्याचीच चाचपणी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे.

सध्या मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आढावा बैठका घेतल्या जात आहे. ठाकरे गट ज्या मतदारसंघात ताकत आहे, तिथे आपला दावा सांगणार हे निश्चित. यात संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सर्वांत वर आहे. संभाजीनगरमधून कोणाला लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवायच हा उद्धव ठाकरेंसमोरचा प्रश्न आहे. संभाजीनगरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन दावेदार आहेत. अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. चंद्रकांत खैरे माजी खासदार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची? यासाठी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली. पण या बैठकीत त्यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांना बोलावले नाही. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैर यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. यात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख होते. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? हे लवकरच कळेल.

 61 Total Likes and Views

0 Comments

No Comment.