मराठा आरक्षणाला सर्वांत मोठा विरोध शरद पवारांचाच होता; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Analysis
Spread the love

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवले. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकले होतं. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 163 Total Likes and Views

0 Comments

No Comment.