२०२४ मध्ये पंतप्रधान मोदी हिंदूहृदयसम्राट म्हणून सादर होतील; काँग्रेस नेत्याची भाजपवर टीका

Analysis
Spread the love

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्येतील श्री राम भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. तर, १४ फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथेही एका हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी मोदींना बोलावण्यात आले आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी मोदींवर टीका केली आहे.

शशी थरूर यांनी एक्सवर पोस्ट लिहित मोदींना उद्देशून टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर आणि १४ फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर लवकरच निवडणुका होतील अशी माझी अपेक्षा आहे. २००९ मध्ये गुजरात इंक.चे सीईओ, भारतीय मतदारांना आर्थिक विकासाचा अवतार म्हणून मोदींना विकले गेले. नोटबंदीनंतर मोदींविरोधात वातावरण तयार झाले होते. परंतु, पुलवामा हल्ल्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांचं राष्ट्रीय सुरक्षा निवडणुकीत रुपांतर झाले. २०२४ मध्ये, हे स्पष्ट आहे की भाजप आता आपल्या मूळ संदेशाकडे परत येईल आणि नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून देशासमोर सादर करतील.

अच्छे दिनचे काय झाले? वर्षाला २ कोटी नोकऱ्यांचे काय झाले? आर्थिक वाढीचे काय झाले, ज्यामुळे सामाजिक-आर्थिक पातळीवर खालच्या भागांना फायदा होईल. प्रत्येक भारतीयाच्या खिशात आणि बँक खात्यात डिस्पोजेबल उत्पन्न टाकण्याचे काय झाले? असे प्रश्न सर्व विचारतात. हिंदुत्व विरुद्ध लोककल्याण असा आकार घेणाऱ्या निवडणुकीत या प्रश्नांवर चर्चा करावी लागेल, असेही शशी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे लोकनेते, त्यांनी महायुतीत सहभागी व्हावे; शिवसेनेकडून खुली ऑफर

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक समारंभाच्या आधी, पंतप्रधान मोदी ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे. दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत यांना हिरवा झेंडा दाखविण्यात येईल.

 215 Total Likes and Views

1 Comments
Weight loss Gummies January 4, 2024
| | |
I loved it as much as you'll end it here. The sketch and writing are good, but you're nervous about what comes next. Definitely come back because it's pretty much always the same if you protect this walk.