मंदिर बांधणी खर्चाकडे बोट दाखणाऱ्यांना मोदींनी असा दिला चेकमेट !

Analysis
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येत दाखल झाले. अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरले. यानंतर १५ किलोमीटरचा रोड शो करण्यात आला. पीएम मोदींचा ताफा धरमपथ, हनुमानगडमार्गे अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचला. तिथं त्यांनी नव्यानं बांधलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. यानंतर अयोध्या धामहून धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. रेल्व स्थानकाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या ठिकाणी पोहचले. एका मोठ्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. ‘सियावर रामचंद्र की जय’ अशी घोषणा देत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, “आज देश आणि जग २२ जानेवारीची वाट पाहत आहे. अयोध्यावासीयांचा उत्साह वाढला आहे. इतरांप्रमाणे मीही त्या क्षणाचा साक्षीदार होण्यास उत्सुक आहे. अयोध्येच्या रस्त्यावर आज दिसणारा उत्साह विलक्षण होता.” सभेपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. तिथं कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी एका दलित कुटुंबाला भेट दिली. मीरा यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून या योजनेचा अभिप्राय घेतला. त्यांनी मीरा मांझी यांना श्रीरामांच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रिणं दिलं.

श्रीरामांसह ४ कोटी गरिबांना पक्की घरं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज इथं विकासाचा उत्सव साजरा होतोय. काही दिवसांनी आपल्या वारशाची भव्यता आपल्याला पाहायला मिळेल. अयोध्या हे प्राचीन शहर समृद्धीचे शिखर होते. ते आनंदाने भरलेले होते. अयोध्येची प्राचीन भव्यता धार्मिक ग्रंथात लिहिलेली आहे. या भव्यतेला आधुनिकतेशी जोडून परत आणावं लागेल. हे अयोध्या शहर संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देणारं आहे.” भुतकाळातील घटनांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “एक काळ असा होता की श्रीराम तंबूत बसत होते, आज फक्त श्रीरामचं नाही तर तर देशातील चार कोटी गरीबांना कायमस्वरूपी पक्की घरं मिळालीयेत.”

विरोधकांना चेकमेट

राम मंदिर उभारणी खर्चाकडे बोट दाखवण्याचं काम विरोधकांकडून सुरु होतं. विकासाच्या मार्गात मंदिर बांधणी अडथळा ठरत असल्याचं बोललं गेलं. त्यामुळं देशात झालेल्या विविध विकास कामाच्या उभारणीची यादीच पंतप्रधान मोदीेंनी वाचून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज भारत आपल्या तीर्थक्षेत्रांची शोभा वाढवत आहे आणि ३० हजारांहून अधिक पंचायत इमारती देखील बांधल्या गेल्यात. ३१५ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयं उभारली गेलीयेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि महाकाल कॉरिडॉर उभारले गेलेत. सोबतच २ लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या गेल्यात. आज आपण चंद्र, सूर्यांचं अंतर आणि समुद्राची खोली मोजत आहोत. विकास करायचा असेल तर आपला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा खोडून काढण्याचंही काम केलं.

नेताजींची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण काढली. ३० जानेवारी या तारखेचा संदर्भ त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “१९४३ मध्ये याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आज आपण स्वातंत्र्याचा हा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताचा संकल्प आम्ही पुढे नेत आहोत. विकासाबाबत कार्यक्रम ताकदीने राबवले जात आहेत.”

आठ ट्रेन्सना हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला पोहोचून सुमारे १५ किलोमीटर अंतराचा भव्य शो केला. पंतप्रधान मोदींनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचून ८ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. अमृत ​​भारत एक्स्प्रेस ट्रॅकच्या दोन्ही बाजूला लोको लावून त्याचा वेग बर्‍यापैकी ठेवता येतो. या एक्स्प्रेस ट्रेनमुळे लोकांचा प्रवास अधिक चांगला आणि कमी वेळेत पुर्ण होणारंय. या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या मागे असलेल्या दलित वसाहतीत पोहोचले. मीरा मांझी यांची भेट घेतली. निषादराज यांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी उपस्थित लहान मुलांशीही संवाद साधला. त्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहिल्या. यानंतर मुलांसोबत सेल्फीही काढला.

 219 Total Likes and Views

0 Comments

No Comment.