ayodhya mandir construction

टीव्हीताईंच्या डोळ्यातले अश्रू…

Editorial
Spread the love

हल्ली पूर्वीसारखं काही उरलं नाही….सगळीकडे परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे…..कोणाला कशाचं काही वाटत नाही….हल्लीच्या मुलांना काही करांवंसंच वाटत नाही…एक ना दोन, हा सूर गेल्या काही दिवसात खूप ऐकायला मिळतोय. सार्वजनिक जीनात, नाक्यांवर, कट्ट्यांवर, गप्पाष्टकांमधे सगळीकडे हीच तक्रार कानावर येते. त्यातही मिडियाले म्हटल्यावर तर लोक काय म्हणतील, ते ऐकावंही लागतं. समोरची व्यक्ती तावातावाने अगदी चुकीचं सांगत असली तरी ते शांतपणे ऐकावं लागतं. हळूवारपणे समजावून सांगां लागतं की तुम्ही करताय तो विचार चूक आहे….

माध्यमांच्या संदर्भात हल्ली लोक सर्रासपणे बोलतात आणि मुख्यत्वे बोलतात, ते टीव्ही वाहिन्यांविषयी, त्यातल्या रिपोर्टर म्हणजेच वार्ताहर प्रतिनिधीपेक्षाही बातम्या सादर करणाऱ्या अँकर्सविषयी, अर्थात वृत्तनिवेदिकांविषयी. वृत्तनिवेदिकांविषयी असे लिहिताना अर्थातच स्त्री-पुरुष समानतेला तिलांजली दिलेली नाही. पण, सर्वसामान्यपणे लोक चर्चा करतात ती प्रभी वृत्तनिवेदक कां वृत्तनिवेदिकांविषयी.

या आठवड्यात नाक्यानाक्यांवर, गल्लोगल्ली, घराघरात आणि चहाच्या टपऱ्यांवरही हीच चर्चा होती की अमुक तमुक निवेदिका अयोध्याच्या प्रभू रामचंद्राच्या संदर्भात बातमी सांगताना चक्क रडली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि मग हे भावविभोर झाल्याचे किंवा आनंदाचे, भक्तिभावाचे अश्रू आहेत, वगैरेही सांगितले गेले, याचीही पब्लिक चर्चा करत आहे.

ही चर्चा करताना अर्थातच या क्षेत्रात तीन दशके काम केलेले पत्रकार, या नात्याने अस्मादिकांनाही लोक धारेवर धरतातच. पण, यासंदर्भात थोडा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. पूर्वी थेट लोकमान्य टिळक, आगरकर यांसारख्या थोरामोठ्यांची नावे घेऊन पत्रकारांना जाब विचारले जायचे आणि निस्पृहतेची अपेक्षा केली जायची. आता, लोक सिटिझन जर्नालिस्टसारखे सिटिझन जजेस झाले आहेत आणि ते हातातील मोबाईलची बटने दाबून अहोरात्र न्यायाधीशाचेच काम करू लागले आहेत. त्यामुळे उतल मोबाइल, दाब बटन आणि कर एखाद्याच्या आयुष्याचा फैसला, या पद्धतीने क्रूर कॉमेन्ट्सच्या टोळधाडी कोट्यधी मोबाइल्सवरून आक्रमकपणे हल्ले करताना दिसत आहेत. ती प्रसिद्ध टीव्ही निवेदिका साश्र नयनांनी रामलल्लाच्या अयोध्येतन बातमी देती झाली आणि इकडे कॉमेंट्स सॉरी कमेन्ट्सचा महापूर सुरू झाला.

सोशल मिडियावर सक्रीय असणाऱ्यांना आता नेटकरी म्हणण्याऐजी बोटकरी म्हणायला हरकत नाही. ते फक्त बोटांनीच विश्व निर्माण करत असतात, तेही आभासी. या साश्रू नयनांनी अयोध्येतील वार्ता देणाऱ्या निवेदिकेचे ठीक आहे. पण, नवी दिल्लीतील एका प्रसिद्ध निवेदकाने तर भगवी वस्त्रे परिधान करूनच वार्तांकन केले आहे. त्यावरही बोटकरी व्यक्त होत आहेत.

लहानपणी मित्रांशी स्पर्धा करताना मित्राने काहीही सांगितले तरी आपली त्यापेक्षा वरचढ बात असावी, यासाठी शेवटी तू काहीही सांगशील तर त्यावर माझे एक पूज्य, म्हणजे तू सांगशील त्याच्या दहापट माझे म्हणणे आहे, असा युक्तिवाद केला जायचा. त्याची आठवण या वाहिन्यांच्या क्रूर चेष्टेनंतर होत आहे. वाहिन्यांची जीवघेणी, गळेकापू स्पर्धा हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचे ठीक आहे, पण हे सगळे बोटकरी मात्र काम ना धाम, फुकटचा घाम, या पद्धतीने मोबाइल कंपन्यांचे उत्पन्न वाढवत आहेत.

वाहिन्यांच्या स्पर्धेमुळे आता पत्रकार किंवा रिपोर्टर इम्पार्शल, तटस्थ वगैरे नसतो तर तो बातमीच्या रंगात माखून जातो. होळीची बातमी देताना तो अंगावर रंग उडवलेल्या अवस्थेत टीव्हीसमोर दिसतो, भाज्यांचे भाव वाढले, हे सांगताना भाजीच्या दुकानात भाजीवाला असल्यासारखाच आविर्भावही करतो, अयोध्येत वार्तांकन करताना समोरच्याने आपल्याश बोलावे, खुलून बोलावे, यासाठी आपणही कसे रामभक्त आहोत, हे दाखवण्याची स्पर्धाच वाहिन्यांवर सुरू आहे.

मार्केटिंगच्या जमान्यात बाजाराच्या नियमाप्रमाणे अतिविपणनातून अखेरीस ग्राहक हाच उत्पादक बनू लागतोय, याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. घरात बसून टीव्ही बघणारे, टीव्हीवरची ही महिला का रडतेय, शी चर्चा करतील. त्यातच महिलेचे, तिच्या वाहिनीचे हित आहे. सिनेमातील पडद्यावर हसणारे, रडणारे अभिनेते निर्मात्याने पैसे दिले की हव्या त्या भावना चेहऱ्यावर आणतो, पुष्पा- फ्लॉवर समझा क्या म्हणतो तसेच रामलल्लाच्या अयोध्येत या टीव्ही ताईंना डोळ्यात अश्रू येतात. फार मनाला लावून घेऊ नका….

शैलेन्द्र परांजपे

 48 Total Likes and Views

0 Comments

No Comment.