जन्मदर कमी होऊनही लोकसंख्या झपाट्याने वाढतीये?

Editorial
Spread the love

लोकसंख्येचा बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. आता प्रश्न आहे की जगाची लोकसंख्येचा नेमका आकडा किती आहे. जानेवारी २०२४ पासून जगाची लोकसंख्या ८ अब्जांच्या पुढे जाईल. अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. अहवाल सांगतो की गेल्या वर्षभरात जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ७.५ कोटींनी वाढ झालीये. अहवालानुसार, जगात दर सेकंदाला ४.३ लोक जन्माला येतात, तर दर सेकंदाला २ लोकांचा मृत्यू होतो. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, १ जानेवारी २०२४ ला जगाची एकूण लोकसंख्या ८.०२ अब्ज असेल. १ जानेवारी २०२३ ला हा आकडा ७.९४ अब्ज होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये, यूएनचा अंदाज होता की जगाची लोकसंख्या ८ अब्ज इतक होईल. लोकसंख्या १ अब्जने वाढण्यास सुमारे ११ वर्षे लागली.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो जुटारेस यांनी लोकसंख्येच्या वाढीचे श्रेय वैज्ञानिक यश, पोषण, आरोग्य आणि स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणांना दिलंय. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, २६ सप्टेंबर २०२३ ला जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर पोहचली. यूएस ब्युरोनं म्हटलं होतं की त्यांची आकडेवारी यूएनपेक्षा वेगळी आहे, कारण काही देशांमध्ये जन्म आणि मृत्यू दर मोजण्यासाठी योग्य यंत्रणा नाही. लोकसंख्या ९ अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १४ वर्षे लागतील, अशी भीती सेन्सेक्स ब्युरोने व्यक्त केलीये. त्याच वेळी, लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी १६.४ वर्षे लागू शकतात. सेन्सेक्स ब्युरोनुसार, लोकसंख्या वाढीच्या दरात घट होण्याचं कारण म्हणजे कमी प्रजनन दर आहे.

सध्या जगात तरुणांची संख्या कमी आहे, ज्याचा थेट परिणाम लोकसंख्येवर होत आहे. याशिवाय कोरोना महामारीचा लोकसंख्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला आहे. महामारीमुळे, जागतिक आयुर्मान म्हणजेच लोकांचे सरासरी वय २०२१ मध्ये ७१ वर्षे इतकं कमी झालंय. सेन्सेक्स ब्यूरोने आपल्या अहवालात म्हटले आहे की १ जानेवारी २०२४ ला अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३५.९ दशलक्ष होईल. १ वर्षात सुमारे १७.५९ लाखांची वाढ नोंदवली गेलीये. अहवालानुसार, जानेवारी महिन्यात अमेरिकेत दर ९ सेकंदाला एका मुलाचा जन्म होईल. त्याच वेळी, दर ९.५ सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होईल.

आकडेवारीनुसार, १९५१ मध्ये एका महिलेने सरासरी ५ मुलांना जन्म दिला. आता २०२१ मध्ये हा आकडा २.५ वर आला आहे. गेल्या ७० वर्षांत जन्मदर निम्म्यावर आला आहे. त्यामुळे आता प्रश्न पडतो की जन्मदर निम्मा असतानाही जगाची लोकसंख्या एवढ्या वेगाने कशी वाढली? जन्मदर हा लोकसंख्येच्या अर्ध्याच गोष्टी सांगतो. जेव्हा आपण मृत्यू दर पाहतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की आता दरवर्षी १ हजार लोकांपैकी ७.६० लोकांचा मृत्यू होतो, तर १ हाजर लोकांमध्ये दरवर्षी सुमारे १८ लोकांचा जन्म होतो. म्हणजे जन्मदराचा आकडा मृत्यूदराच्या २ पट जास्त आहे. लोकसंख्या वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

एप्रिल २०२३ मध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. संयुक्त राष्ट्राच्या सेन्सेक्स ब्युरोनं आपल्या अहवालात ही माहिती दिली. त्यानुसार भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येपेक्षा ३० लाख अधिक होती. युएन १९५० पासून जागतिक लोकसंख्येशी संबंधित डेटा जारी करत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त आहे. २०२२ मध्ये यूएनच्या आधीच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या केवळ ८ देशांमध्ये असेल. यामध्ये काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, पाकिस्तान, नायजेरिया, फिलीपिन्स आणि टांझानिया यांचा समावेश आहे. सध्या, ४६ देशांची लोकसंख्या सर्वात वेगाने वाढत आहे, त्यापैकी ३२ देश उप-सहारा आफ्रिकेत आहेत. असा अंदाज आहे की २०५० पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या या भागात राहतील. दुसरीकडे, असे ६१ देश आहेत ज्यांची लोकसंख्या २०२२ ते २०५० दरम्यान कमी होईल. त्यापैकी सर्वाधिक देश हे युरोपातील आहेत.

 57 Total Likes and Views

0 Comments

No Comment.