लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असंय भाजपचं न्यु ईअर प्लॅनिगं !

Editorial
Spread the love

मागच्या महिन्यात पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल आले. पैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान जिंकण्यात भाजपला यश आलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची ‘नवी रणनिती’ काय असेल याची चर्चा आहे. कारण, उत्तरेत जिंकलेल्या तिन्ही राज्यात त्यांनी मुख्यमंत्री पदी नवा चेहरा दिला आहे. अनेक खासदारांची तिकिटे कापली जातील अशी शक्यता आहे. काही मंत्र्यांची हकालपट्टीही होऊ शकते. भाजपच्या नव्या भूमिकेत स्वतःला झोकून देण्याचं काम आता कार्यकर्त्यांना करावं लागणारंय. केंद्रात सलग तिसर्‍यांदा सत्तेत राहून निवडूण येणाचा विक्रम नेहरुंनी केला होता. तो विक्रम मोडीत काढण्याची संधी आता मोदींना मिळते आहे. या सर्व प्रक्रियेत भाजपचा न्युयर प्लॅन काय असेल? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हवंय.

नव्या चेहऱ्यांना संधी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त ते करतायेत. भाजपचा विजय झाल्यास संभाव्य नव्या मंत्रिमंडळावरतीही विचार होतो आहे. विचार करावा लागेल. काही जुने चेहरे वगळून नव्या लोकांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. पक्ष संघटनेतही बदल होऊ शकतात, असं काही नेत्यांचे मतंय. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. नड्डा यांच्या जागी भाजपचे अनुभवी नेते धर्मेंद्र प्रधान किंवा भूपेंद्र यादव यांच्या हाती सुत्रं येवू शकतात. राजकीय विश्लेषकही हेच मत नोंदवत आहेत. ते म्हणातेय की, “काही सांगता येणार नाही. निवडणूकी उतरवलेले खासदार आणि राजस्थानचे मुख्यमंत्री पहा. ज्या नावांची चर्चा होती त्यापैकी एकही नाव निवडले गेले नाही. आजच्या भाजपमध्ये कोणतेही अनपेक्षित नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.” २०२४ मध्ये भाजपच्या चेहऱ्यांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल पाहायला मिळतील याची अचूक माहिती कोणीही देऊ शकत नाही, परंतु नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहे. २०१९ मध्ये जसे काही चेहरे विस्मृतीत गेले, नवीन चेहरे उदयास आले, तसंच कदाचित २०२४ मध्ये पहायला मिळू शकतं.

लोकसभेनंतर तीन विधानसभा निवडणुका

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत. विधानसभा राज्यांमध्येही काही आश्चर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात, असं पक्षाच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. पक्ष सामूहिक नेतृत्वाचा मार्ग स्वीकारतो की नाही यावर मनोहर लाल खट्टर यांचे हरियाणातील भवितव्य अवलंबून असेल. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हरियाणा जिंकणे कदाचित सोपे होणार नाही. जाटांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. काँग्रेसकडे जाट नेते भूपेंद्र सिंह हुडा आहेत. त्यामुळं तिथं काटे की टक्कर अपेक्षित आहे.

फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्न चिन्ह

राज्यात महायुतीचा विस्तार झाला आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसोबत अजित पवार ही सरकारमध्ये सामील आहेत. त्यामुळे भाजपने पुन्हा महाराष्ट्र जिंकल्यास नवा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्यात भाजपची सर्व सुत्रं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. आगामी विधानसभेत सर्वाधिक जागा भाजपकडे आल्यास मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरु होईल. यात फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळेक का? हा प्रश्न आहे. राज्यात नेतृत्त्वाचे दावे वाढत आहेत. अशावेळी भाजप समतोल साधण्याचा प्रयत्न करेल, जो फडणवीसांच्या बाजूने नसेल. अशी चर्चा आहे. राज्यात सुरु असलेलं मराठा आरक्षणाचं वारं कोणती दिशा घेतं ? यावरही राज्य नेतृत्त्वाची सुत्रं कुणाला मिळतील? या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे.

 47 Total Likes and Views

0 Comments

No Comment.