गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकलं मागे; अदानींची संपत्ती किती?

Editorial
Spread the love

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ते जगातील 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 7.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरले आहेत. 

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती 97 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या 24 तासांत त्याची एकूण संपत्ती 665 दशलक्षने वाढली आहे. अदानी समूहाचा मालक आणि आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आले आहेत. गुरुवारपर्यंत अदानी या यादीत 14 व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या 24 तासांत त्याने केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 97.6 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.

 46 Total Likes and Views

0 Comments

No Comment.