आमदार अपात्रता निकालासाठी उरले 49 तास, राहुल नार्वेकरांकडे काय आणि किती पर्याय?

Editorial
Spread the love

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणी काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. 

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जून 2022 मध्ये बंडखोरी केली आणि भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री झाले. शिंदेंच्या बडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतर या संदर्भात अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. सादर झालेले पुरावे, कागदपत्रं, नोंदवलेल्या साक्षी असा प्रवास करत अखेरीस शिवसेनेच्या दोन गटांमधील शिंदे गट की ठाकरे गट अपात्र (MLA Disqualification) ठरणार? याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. दोन्ही गटांकडून निकालाच्या बाजूने दावे केले जात आहेत. राहुल नार्वेकर तयार आहेत दोन्ही गट सज्ज झालेत.. काऊंटडाऊनही सुरू झालंय. आता प्रतीक्षा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

राहुल नार्वेकरांसमोर काय आहे पर्याय? (Rahul Narvekar)
सध्याच्या परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे ठाकरे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा पर्याय आहे तर दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. किंवा मग कोणत्याही गटाच्या बाजूने निकाल देण्याऐवजी राहुल नार्वेकर स्वत:च विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशीही शक्यता वर्तवली जातेय. नाहीतर राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देऊन, कोणत्याही गटाला अपात्र ठरवणार नाही. या फक्त शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी (7 जानेवारी 2024) वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. आपआपली केस अधिक मजबूत करण्यासाठी त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यानह आपली भूमिका कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेकडे ऐतिहासिक राजकीय घटना म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासांत अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 30 Total Likes and Views

2 Comments
BreakReloadd January 30, 2024
| | |
My brother suggested I might like this website He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks
BreakMissedd January 29, 2024
| | |
Fantastic site A lot of helpful info here Im sending it to some buddies ans additionally sharing in delicious And naturally thanks on your sweat