राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

Analysis
Spread the love

Mumbai : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. मी या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार.. अयोध्येला जाणार !! अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आले.”

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं ही उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत निमंत्रित आहे, ते जाणून घ्या.

22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार : उद्धव ठाकरे
“बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते.” असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते.

साडेतीनशे VVIP ना निमंत्रण
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही. त्याशिवाय शरद पवार यांना अजूनही निमंत्रण पोहचलेले नाही. लवकरच या सर्वांना निमंत्रण पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

 2,957 Total Likes and Views

6 Comments
Vheonn January 30, 2024
| | |
you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter
nyaffairss January 30, 2024
| | |
Hello i think that i saw you visited my weblog so i came to Return the favore Im trying to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas
BusinesAfair January 29, 2024
| | |
I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts
Esteens January 29, 2024
| | |
My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks
JournalBeast January 28, 2024
| | |
Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem
FeedNotes January 28, 2024
| | |
Just wish to say your article is as surprising The clearness in your post is just cool and i could assume youre an expert on this subject Fine with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please keep up the enjoyable work