बाय बाय मालदीव

Editorial
Spread the love

कोण एकेकाळी दक्षिण आशियामध्ये एक नितांतसुंदर आणि निसर्गरम्य असा देश होता. त्याचे नाव होते मालदीव. तब्बल एक हजार छोट्या छोट्या बेटांचा हा देश जवळपास वर्षभर पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला असे. भारतातील फिल्म स्टार्स फोटोशूट करण्यासाठी मुद्दाम मालदीव येथे जात असत. नवविवाहित जोडप्यांसाठी मालदीव हा स्वर्ग समजला जात असे. निवांत असा निळाशार समुद्र, अत्यंत कमी लोकवस्ती, पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय आणि एकंदरीतच निसर्गाने भरभरून आशीर्वाद दिलेला देश म्हणजे मालदीव होता. एका विशिष्ट धर्माचे प्राबल्य असलेल्या या देशामध्ये पर्यटन या व्यवसायामध्ये तो धर्म कधी आलेला नव्हता. जात, धर्म आणि व्यवसाय यांची गल्लत करणाऱ्यांची हमखास हानी होते हे पर्यटनावर भक्कम पैसा कमावणाऱ्या मालदीवच्या लक्षात आले नाही.

    1965 मध्ये स्वतंत्र झालेल्या मालदीवला आपला जवळचा शेजारी म्हणून भारताने सातत्याने मदत केली होती. पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून ते पिण्याचे पाणी कमी पडल्यानंतर तेही पुरवण्यापर्यंत भारताने या देशाला मोठ्या भावासारखी मदत केली. दक्षिण आशियात आपला एक मित्र असावा आणि त्याच्याशी आपले संबंध चांगले असावेत हा आपल्या देशाचा प्रयत्न होता. एवढेच नव्हे तर शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भारताने आपले लष्करही मालदीवच्या दिमतीला तयार ठेवलेले होते. अशा या मालदीव देशाला 2022 या वर्षी एक नवीन सत्ताधारी भेटला जो भारत विरोधी होता. चीनच्या कच्छपी लागलेल्या देशांचे जे होते ते मालदीवचे होण्यास सुरुवात झाली. नवीन निवडून आलेला सत्ताधारी चीनधार्जिणा होता. सत्तेच्या सिंहासनावर बसताच या उर्मट गृहस्थाने भारताचे महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराला तात्काळ मालदीव मधून निघून जाण्यास सांगण्यात आले. इथपर्यंत सगळे ठीक होते. आपले परराष्ट्र धोरण ठरविण्याचा प्रत्येक देशाला अधिकार असतो आणि तो मालदीवला पण आहेच यात काही वाद नाही.

  नुकत्याच झालेल्या इजराइल आणि हमास यांच्या युद्धाचा संदर्भ देत नव्या मंत्रिमंडळातील काही बेताल मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या श्री नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अत्यंत हिणकस असे शेरे मारले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्याचवेळी आपल्याच देशाचा भाग असणाऱ्या लक्षद्वीप या नितांत सुंदर निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यास पंतप्रधानांनी भेट दिली. लक्षद्वीपला भेट द्या असे त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले. पंतप्रधानांच्या या भेटीवर मालदीव मधील बिनडोक मंत्र्यांनी शिवराळ भाषेत टीका केली. पंतप्रधान कोणीही असो, तो आपल्या विचाराचा असो की नसो, पण तो देशाचा पंतप्रधान असतो आणि देशाच्या पंतप्रधानाचा आपणच मदत केलेल्या छोट्याश्या देशाने धार्मिक कारणावरून केलेला अपमान देशवासीयांना दुखावून गेला. मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांपैकी भारतीय लोकांची संख्या जवळपास 80 टक्के होती. बायकॉट मालदीव, म्हणजे मालदीवला जाणेच नको ही भावना जेमतेम बारा तासांमध्ये देशभर पोचली. कधी नव्हे ते फिल्मी सितारे यांनी पण तात्काळ मालदीवचा निषेध केला. अवघ्या काही तासात आठ हजार पेक्षा जास्त लोकांनी आपले मालदीव मधील हॉटेल बुकिंग रद्द केले. 25 हजार पेक्षा जास्त विमान तिकीटे रद्द करण्यात आली आणि यापुढे मालदीवला जायचे नाही असे कोणीही न सांगता भारतीय जनतेने ठरवले. आपल्या पर्यटनावर होणारा परिणाम लक्षात येताच मालदीवच्या सरकारने पंतप्रधानांवर अपमानास्पद टिप्पणी केलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी केली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारतीय जनसामान्यांचा हा बुलंद आवाज मालदीवची अर्थव्यवस्था खिळखळीत करून गेला. बेटांवरील हॉटेल्स रिकामे पडण्यास सुरुवात झाली. भारतीय पर्यटकांनी भरलेले मालदीवचे समुद्रकिनारे सुने सुने होऊन गेले.

   आपली मदत करणाऱ्या आपल्याच एका मित्राच्या पाठीत आपण खंजीर खुपसतोय आणि तेही अत्यंत बलाढ्य अशा मित्राच्या हे मालदीव हा देश विसरला. धार्मिक आंधळेपणाची पट्टी डोळ्यावर चढविल्यानंतर भविष्य धूसर होते आणि रस्त्यावर यावे लागते हे मालदीवमुळे सर्व जगाला दिसून आले. आणखी पाच वर्षानंतर कोणी एकेकाळी मालदीव नावाचा देश आपल्या निसर्ग सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांनी भरलेला होता असे म्हणावे लागणार आहे.अशा प्रकारे मालदीव नावाच्या देशाने आंधळ्या धर्मांधतेची फुंकर घालून स्वतःच्या देशाचा दीप मालवून टाकला हे इतिहासात लिहिले जाईल.मेरा देश बदल रहा है.आता तो बलाढ्य देश झाला आहे हे जगाला समजलेले आहे.

 53 Total Likes and Views

6 Comments
NewsOuterr January 29, 2024
| | |
Simply wish to say your article is as amazing The clearness in your post is just nice and i could assume youre an expert on this subject Well with your permission let me to grab your feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work
BlogSeventyy January 29, 2024
| | |
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up
TimesMerkk January 29, 2024
| | |
Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply
WesterTimes January 28, 2024
| | |
Wow wonderful blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is great as well as the content
BlogSeventy January 28, 2024
| | |
Fantastic site A lot of helpful info here Im sending it to some buddies ans additionally sharing in delicious And naturally thanks on your sweat
NexerNews January 27, 2024
| | |
Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job