नागपुर, ९ ऑक्टोबर २०२५: एशियन पेंट्सने त्यांची लोकप्रिय, हर घर कुछ कहता है मोहीम परत आणली आहे जी आधुनिक घरे आणि नातेसंबंधांचे प्रतिबिंब दर्शवण्यासाठी पुनर्निर्मित केली आहे. नवीन जाहिरात प्रत्येक कुटुंब त्यांनी मागे सोडलेल्या शांत, अर्थपूर्ण क्षणांना आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी हळूवार कथन आणि विचारशील कथाकथनाचा वापर करते.
ही मोहीम भारतीय घरे उबदार, चैतन्यशील आणि त्यात राहणाऱ्या लोकांनी जागांना दिलेल्या आकारांद्वारे कशी बदलत आहेत हे अधोरेखित करते. कुटुंबे आणि व्यक्ती सर्जनशीलतेद्वारे त्यांची स्वतःची शैली जोडून प्रत्येक घर अद्वितीय आणि व्यक्तिमत्त्वाने कसे परिपूर्ण बनते हे ते साजरे करते.
या टीव्हीसीमध्ये घर बनवण्यासाठी काय आवश्यक आहे यावर एक आधुनिक दृष्टीकोन व्यक्त करते, तसेच परिचित हर घर कवितेचे आकर्षण पार्श्वभूमीत जतन करते. हलके फुलके किस्से आणि सुंदर दृश्यांद्वारे, लोक त्यांचे घर कसे खास बनवतात याचे अनेक आगळेवेगळे मार्ग दाखवते – यात एक तरुण जोडपे त्यांची जागा वैयक्तिकृत करण्यापासून एक फूड व्लॉगर्ने त्याच्या आजीच्या मदतीने चित्रीकरण करणे, एका वृद्ध जोडप्याने परदेशी पाहुण्यांचे उबदार स्वागत करणे आणि पाळीव प्राण्याच्या पालकाने त्याच्या पाळीव प्राण्याला कुटुंबासारखे वागवणे दाखवले आहे. प्रत्येक किस्सा घराला घरपणात रूपांतरित करणाऱ्या छोट्या क्षणांचा उत्सव साजरा करतो
हा चित्रपट एक रेंगाळणारा विचार मागे सोडतो: प्रत्येक घर आत कोण राहते हे शांतपणे व्यक्त करते. घराचा मूळ गाभा त्याच्या भिंती आणि छत नसून तो त्यातील रहिवासी, त्यांच्या भावना , दैनंदिन जीवन आणि आठवणी आहेत याचे हे पुन:स्मरण आहे .
नवनिर्मित मोहिमेबद्दल बोलताना, एशियन पेन्टसचे एम डी व सीईओ अमित सिंगल म्हणाले, “‘हर घर कुछ कहता है’ च्या या नवीन अध्यायाद्वारे, आम्ही भारतीय घरांचे विकसित होत जाणारे स्वरूप आणि कुटुंबे त्यांना सजीव करण्याच्या अनोख्या पद्धती साजरे करत आहोत. आजची घरे पूर्वीपेक्षा अधिक चैतन्यशील, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक व्यक्तीनिहाय आहेत. घराचा प्रत्येक कोपरा सर्जनशीलता, व्यक्तिमत्व किंवा सामायिक अनुभवांद्वारे कसा अर्थपूर्ण असतो आणि त्यात वास्तव्य करणार्या लोकांचे प्रतिबिंब कसे प्रतिबिंबित करत राहतो हे या मोहिमेतून आम्हाला प्रदर्शित करायचे आहे. हा चित्रपट घरांना ओळख, सर्जनशीलता आणि नातेसंबंधांची चैतन्यशील स्थाने म्हणून दाखवतो
ऑगिल्व्ही इंडियाचे प्रमुख सल्लागार पीयूष पांडे यान्नी व्यासपीठाच्या उत्क्रांतीवर विचार व्यक्त केले, ” घरे नेहमीच बोलत होती, ती नवीन संभाषणे कशी सुरू करत आहेत ते फार सुंदर आहे. हर घर कुछ कहता है चा हा नवा अध्याय आजची जीवनशैली प्रामाणिकपणा, विनोदबुध्दी आणि सहृदयतेने काबीज करतो. आपल्या सभोवतालचे जग बदलत असले तरी, आपण ज्या भावनांनी आपले घर बांधतो त्या कालातीत राहतात याची तो आपल्याला आठवण करून देतो”
ही मोहिम हर घर कुछ कहता है च्या लाखो लोकांनी प्रेम केलेल्या कालातीत ब्रॅन्ड परंपरेच्या आत्म्याचा आधार घेते आणि प्रत्येक घर, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कथेचा सोहळा साजरा करते.
एशियन पेन्ट्स बद्दल:
१९४२ मध्ये स्थापन झाल्यापासून, एशियन पेंट्स ही भारतातील आघाडीची आणि आशियातील दुसरी सर्वात मोठी पेंट कंपनी बनली आहे, ज्याची एकत्रित उलाढाल ₹३३,७९७ कोटी (₹३३८ अब्ज) आहे. ते रंग आणि डिझाइनच्या सीमा उल्लंघून, जागांचे सौंदर्य वृध्दिंगत करत राहते, व अशा प्रकारे ग्राहकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव निर्माण करते. ही संस्था १४ देशांमध्ये कार्यरत असून त्यांच्या जगभरात २६ रंग उत्पादन सुविधा आहेत, ज्या ६० हून अधिक देशांमधील ग्राहकांना सेवा देतात.
एशियन पेंट्स नेहमीच पेंट उद्योगात आघाडीच्या स्थानावर राहिले आहे, त्यांनी भारतात कलर आयडियाज, ब्युटीफुल होम्स पेंटिंग सर्व्हिस, कलर नेक्स्ट आणि एशियन पेंट्स ब्युटीफुल होम्स स्टोअर्स सारख्या नवीन संकल्पना निर्माण करून त्यांचे पदार्पण केले आहे. एशियन पेंट्स डेकोरेटिव्ह आणि औद्योगिक वापरासाठी पेंट्स आणि कोटिंग्जच्या विस्तृत श्रेणींचे उत्पादन करते आणि वैशिष्ट्य़पूर्ण पेंटिंग आणि इंटीरियर डेकोर सोल्यूशन्स देखील देते. डेकोरेटिव्ह व्यवसाय पोर्टफोलिओमध्ये वॉटरप्रूफिंगसाठी स्मार्टकेअर श्रेणी, लाकडी फिनिशसाठी वुडटेक उत्पादने आणि सर्व पृष्ठभागांसाठी ॲडेसिव्ह श्रेणी समाविष्ट आहे.
एशियन पेंट्स होम डेकोर उत्पादनांची विस्तृत श्रेणी देखील देऊ करते आणि ती भारतातील ए्कीकृत डेकोर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे, आणि ते मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब, बाथ फिटिंग्ज आणि सॅनिटरीवेअर, डेकोरेटिव्ह लाइटिंग्ज, यूपीव्हीसी खिडक्या आणि दरवाजे, भिंतीवरील आवरणे, फर्निचर, फर्निशिंग, रग इत्यादी उत्पादने देऊ करतात.
आमच्या इ-मेल डिस्क्लेमर साठी कृपयाFhttps://www.asianpaints.com/disclaimer.html#emailला भेट द्या
