लोकसभेच्या निकालानंतर महायुती आणि मविआत फुट?

लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही […]

Read More

अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली […]

Read More

मोदींना ममता ठोकणार?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि  पुद्दुचेरी  ह्या पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  यातले आसाम सोडले तर कुठेही भाजपची सत्ता नाही.  त्यामुळे ह्या निवडणुकांचे निकाल  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या लोकप्रियतेचे थर्मामिटर  असेल. मोदींच्या कारभारावर  जनता खुश आहे का?   जनमताचा कौल  या निवडणुकांच्या निकालातून  मिळणार आहे.  चुरस पाचही  राज्यात आहे. पण  बंगालमध्ये आरपारची लढाई […]

Read More

पवार-भाजप जवळीक वाढतेय

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि   भाजपचे चाणक्य  अमित  शहा यांची नुकतीच भेट झाली की नाही हे अजूनही रहस्य आहे.   त्यांची भेट झाली असेल किंवा नसेलही. पण एक स्पष्ट आहे.  पवार आणि भाजप यांच्यातली जवळीक वाढते आहे.  दोस्ताना वाढतो आहे. तसा हा दोस्ताना २०१४ मध्येही दिसला होता.  निकाल पूर्ण लागायचे असताना पवारांनी   सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा  […]

Read More

पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने  महाआघाडी सरकारवरचे संकट  लांबले.    बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर  शस्त्रक्रिया आहे.  रुग्णालयातून बाहेर येऊन  चालते फिरते व्हायला  १५ दिवस  आरामात लागतील.  पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही   पूर्वीसारखा आक्रमक नसेल.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]

Read More

पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे […]

Read More

फोडाफाडी सुरु, सांगलीत जयंत पाटलांनी केला चंद्रकांतदादांचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सत्तेचा महिमा अपार आहे.   युतीच्या राजवटीत दोन्ही कॉन्ग्रेसमधले  नेते  भाजपमध्ये घुसू पाहत  होते. भाजपचे तिकीट म्हणजे सत्तेचा पासपोर्ट मानला जात होता. मात्र गेल्या वर्षी राज्यात महाआघाडीची  सत्ता आली  आणि भाजपला ‘बुरे दिन’ आले.  आता उलटी लाट सुरु झाली आहे.  भाजपमधून  बाहेर पडण्याची संधी  अनेक आमदार शोधत आहेत.  उद्धव सरकार लवकरच पडेल असे सांगून   भाजप नेत्यांनी  […]

Read More

राठोड यांचा मुंडे झाला?

            कुणी कितीही पटका,  वनमंत्री आणि शिवसेना नेते  संजय राठोड यांचा बाल बाका होणार नाही.  करोनाच्या भाषेत बोलायचे झाले तर राठोड  ‘निगेटिव्ह’ आहेत, ‘निगेटिव्ह’ राहतील.  राठोड यांना आज सरकार दरबारी जी   वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट झाले.  मराठवाड्यातील पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येच्या  वादात अडकलेले   राठोड  १५ दिवस गायब होते.  काल  अचानक ते पोहरादेवी गडावर […]

Read More

नाना पटोलेंची फजिती, अमिताभच्या ‘झुंड’ सिनेमापुढे आता फक्त काळे झेंडे

              ‘अमिताभ बच्चनचे चित्रपट बंद पाडू’  अशी आक्रमक घोषणा करणारे   प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष  नाना पटोले यांना  हायकमांडने चांगलाच ब्रेक मारला.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  बाबतीत कॉन्ग्रेस  हस्तक्षेप करणार नाही असे कॉन्ग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख  रणदीपसिंह  सुरजेवाला यांनी  दिल्लीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे नानाभाऊंना  एक पाऊल  मागे हटावे लागले.  अमिताभचा बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपट येत्या  १८ जून रोजी  थिएटरमध्ये […]

Read More

कॉन्ग्रेसला देणग्या मिळेनात

करोना संकटात   जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  पैशाची  चणचण  भासू लागली आहे.  सामान्य माणसासारखीच अशी अवस्था कॉन्ग्रेस पक्षाचीही झाली आहे.   देशाची सत्ता गेल्याने  कॉन्ग्रेसला    देणग्या मिळणे खूपच कमी झाले आहे.  कार्पोरेट क्षेत्राकडून २०१२-१३ ते २०१८-१९  या काळात  कॉन्ग्रेसला फक्त ३७६ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले.  या काळात  भाजपला २३०० कोटी रुपये मिळाले.   राष्ट्रवादीला ६९ कोटी रुपये […]

Read More