विविध प्रकारचे अनुभव, निसर्गरम्य हिरवेगार परिसर आणि लक्षवेधक नैसर्गिक सौंदर्यासह केरळ सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आदर्श पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे.
नागपूर, १९ नोव्हेबर २०२६: दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांसोबत देशांतर्गत पर्यटनाचा हंगाम सुरू होत असताना केरळ टुरिझमने पश्चिम आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पार्टनरशिप मीट्स आणि रोड शोजच्या माध्यमातून व्यापक फेस्टिव्ह सीझन मोहीम सुरू केली आहे.या पार्टनरशिप मीट्समध्ये निदर्शनास आणण्यात येईल की, केरळ आकर्षक टूर पॅकेजेससह अद्वितीय अनुभव देणारे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे.

या मोहिमेची सुरुवात करत केरळ टुरिझमने गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्री-सीझन टुरिझम बी२बी पार्टनरशिप मीट्सचे आयोजन केले. यामध्ये मनमोहक आणि उत्साहवर्धक अनुभवांची हमी देणारे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून केरळची वैशिष्ट्ये सादर करण्यात आली.
नागपूरमधील बीटूबी बैठकीत केरळमधील जवळपास ४५ पर्यटन भागीदारांनी स्थानिक ट्रॅव्हल ट्रेड प्रतिनिधींशी संवाद साधला आणि आकर्षक डील्स व हॉलिडे पॅकेजेस सादर केले.
या पॅकेजेसमध्ये केरळला पर्यटनस्थळाच्या रूपात दर्शवण्यात आले, जिथे पर्यटक सहा रात्रींच्या एकाच प्रवासात अनेकविध अनुभवांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये निसर्गरम्य समुद्रकिनारे, शांतमय बॅकवॉटर, उत्साहवर्धक हिल स्टेशन्स आणि मोहक जंगलांसोबत संपूर्ण राज्यात पसरलेल्या नयनरम्य निसर्गाचा समावेश आहे.
पर्यटनाची नवीन आकडेवारी आणि ट्रेण्ड्सनुसार, पर्यटकांच्या संख्येत सर्व सीझन्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात १०.९८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
राज्याला प्रमुख अनुभवसंपन्न पर्यटन केंद्र म्हणून ठामपणे प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा सुट्ट्यांचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करणे या केरळ टुरिझमच्या धोरणात्मक बदलावर या मोहिमेचे लक्ष केंद्रित आहे, असे पर्यटन मंत्री श्री. पी. सी. विष्णूनाध म्हणाले. राज्य सरकारने पर्यटन क्षेत्राला लवकरच उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रातील घटकांना त्यांचे पॅकेजेस नव्याने डिझाइन करण्यासाठी अधिक वाव मिळेल, या पार्श्वभूमीवर माननीय मंत्री यांनी आपले मत व्यक्त केले.
“दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असताना या मोहिमेचा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत राज्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे. संस्कृती, वारसा, प्रार्थनास्थळे आणि शांतमय समुद्रकिनाऱ्यांपासून ते वन्यजीवांचे निवासस्थान व प्रसिद्ध पाककलांच्या ठिकाणांपर्यंत केरळ पर्यटकांना पूर्णपणे उत्साहवर्धक आणि अविस्मरणीय अनुभव देण्याचे आश्वासन देते,” असे श्री. विष्णूनाध पुढे म्हणाले.
केरळ टुरिझमने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी केरळधील वायनाड येथील वैथिरी येथे ‘ब्रँड वायनाड’ उपक्रमाचा शुभारंभ केला. या प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य, कृषी आणि वारसा आकर्षणे तसेच सांस्कृतिक परंपरा भारत आणि परदेशातील पर्यटकांसमोर आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी पर्यटन मंत्री यांनी जबाबदार पर्यटन अभियानाचे नवीन लाइफ एक्सपिरियन्स ट्रेल्स आणि तिरुनेल्ली सर्किट, चेकाडी फार्मला भेट व कॉफी अनुभवाचा समावेश असलेला मार्गदर्शित प्रवास उपक्रम देखील सुरू केला.

वायनाडला सुरक्षित आणि शाश्वत जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी या उपक्रमात जबाबदार पर्यटन उपाययोजना आणि होमस्टे नूतनीकरणाचा समावेश आहे. वायनाडची कॉफी, मसाले, पारंपारिक तांदळाचे प्रकार आणि मध, तसेच स्थानिक खाद्यपदार्थ, कृषी जीवन, आदिवासी वारसा आणि ग्रामीण अनुभव यांची पर्यटनाशी सांगड घातली जाईल, असे श्री. विष्णुनाध यांनी सांगितले.
आदिवासी वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वायनाड येथील ‘एन ऊरू’ वारसा गावाचा विस्तार केला जाईल. तसेच, एक आदिवासी विद्यापीठ आणि वारसा ज्ञान क्षेत्र (हेरिटेज नॉलेज झोन) देखील स्थापन केले जाईल.
सप्टेंबरमध्ये अहमदाबाद आणि वडोदरा येथे आणि गेल्या महिन्यात मुंबई, पुणे, दिल्ली आणि जयपूर येथे झालेल्या बी२बी बैठकांनी निर्माण केलेल्या गतीनंतर आता केरळची नवीन पर्यटन उत्पादने व्यापक पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅव्हल ट्रेड फेअर्समध्ये सहभाग आणि बी२बी रोडशो यांसारख्या विविध नेटवर्किंग उपक्रमांचे आयोजन केले जाईल. या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून टीव्ही, सोशल मीडिया, प्रिंट आणि रेडिओ यांसारख्या माध्यमांचाही प्रभावी वापर केला जात आहे.
केरळला जागतिक स्तरावर कधीही न चुकवावे असे पर्यटनस्थळ म्हणून मिळालेल्या मान्यतेच्या पार्श्वभूमीवर ही आगामी मोहीम आखण्यात आली आहे. लंडनस्थित रफ गाईड्सच्या अलिकडील अहवालात २०२६ मध्ये भेट देण्यासाठी जगातील आघाडीच्या २६ पर्यटनस्थळांमध्ये केरळचा समावेश करण्यात आला आहे, तसेच ‘गॉड्स ओन कंट्री’चा २०२६ मधील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांमध्ये उल्लेख केला आहे.
प्रतिष्ठित जागतिक ट्रॅव्हल गाईड लोन्ली प्लॅनेटने आपल्या ‘२५ बेस्ट एक्स्पिरियन्सेस इन २०२६’ अहवालात केरळच्या खाद्यसंस्कृतीचा २०२६ मध्ये आनंद घेण्यासारख्या जगातील अव्वल २५ सर्वोत्कृष्ट पर्यटन अनुभवांमध्ये समावेश केला आहे आणि या मानाच्या यादीत स्थान मिळवणारे केरळ भारतातील एकमेव राज्य ठरले आहे.
महाराष्ट्र आणि केरळदरम्यान उत्तम रेल्वे व विमान कनेक्टिव्हिटीचा विचार करता महाराष्ट्रातील या बी२बी बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखंडित रेल्वे सेवेशिवाय कोची, तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि कन्नूर यांसारख्या केरळमधील प्रमुख विमानतळांवरून बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली मार्गे विविध वन-स्टॉप विमाने उपलब्ध आहेत. या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटक, व्यावसायिक प्रवासी आणि भेट देणाऱ्यांचा प्रवास अत्यंत सुखकर होतो.
