लक्षणे दुर्लक्ष केल्याने वाढतोय करोना

Analysis News

देशात करोनाचे टेन्शन आहे.  महाराष्ट्रात तर  परिस्थिती आहे. नागपुरात तर  आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्याने  रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीच काय खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल  आहेत.  खाटा  नाहीत. ऑक्सिजनसाठी धावाधाव. तहान लागल्यावर सरकारने विहीर खोदायला घेतल्याने   सारेच हतबल आहेत.   दुसरी लाट येऊ शकते  हे माहित होते. ऑक्टोबरमध्ये   पेशंट कमी झाले होते. पण  ६ महिने वेळ सरकारने वाया घालवला.  सरकारने  आरोग्यसुविधा वाढवल्या नाहीत. आता  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  लॉकडाउनच्या धमक्या देत आहेत.  पण मधल्या काळात  सरकार गाफील का राहिले? याची  उत्तरं  मिळत नाहीत. लॉकडाउन हा उपाय नाही हे माहित असतानाही   तो लावण्याचे डावपेच सुरु आहेत. तसे झाले  तर  लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल.   सरकारने महिन्याला  १० हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला द्यावे आणि खुशाल लॉकडाउन करावा.  करोनाशी सामना हे युध्द असेल तर सरकारने एवढा खर्च करायलाच पाहिजे.  पण ह्या मुद्द्यावर   ना   नरेंद्र मोदी बोलायला तयार आहेत ना आपले उद्धव.

                       लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने, लोकांच्या बेफिकीरीने   करोना वाढला अशी कारणे आता प्रशासनातर्फे सांगितली जात आहेत. नव्या बाधितांची लक्षणे  वेगवेगळी असल्याने हा करोना नसेल  असे अनेकांना वाटते.   रुग्ण उशिरा रुग्णालयात पोचत आहेत. त्यामुळे मृत्यू वाढले  असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  लक्षणे असूनही अनेक रुग्ण आरटीपीसीआर   तपासणी  करून घेत नाहीत.  मेडिकल रुग्णालयात आलेल्या   ६० ते ७० टक्के रुग्णांचा  भरती झाल्यानंतर दोन ते  ते तीन दिवसात मृत्यू झाला असा दावा प्रशासनातर्फे केला गेला.  रुग्णांना  खाटा मिळत नाहीत, कोविड रुग्णालयालाही ऑक्सिजनसाठी  धावाधाव करावी लागत आहे.

                 पेशंट वाढल्याने  यंत्रणेवर ताण  आला आहे.  तो आणखी वाढता कामा नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन  तज्ञ डॉक्टरांनी केले.   लक्षणे असूनही   चाचणीसाठी पुढे न येणाऱ्यांची  संख्या मोठी आहे.  अंटीजेन चाचणी निगेटीव्ह आली तरी गृहविलगीकरणातच राहावे.  ही चाचणी पॉझीटीव्ह  आल्यास पेशंट पॉझीटीव्हच  असतो. मात्र ती निगेटिव्ह आल्यास पेशंट पॉझीटीव्ह  असण्याची शक्यता असते.  त्यासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे.  स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनू नका. नागपूरचे महापौर  दयाशंकर तिवारी पॉझीटीव्ह निघाले आहेत.  नागपूरच्या पहिल्या नागरिकास  करोना होऊ शकतो. मग  आपण कोण आहोत?

0 Comments

No Comment.