भाजपचा अश्वमेध ही ५ राज्ये अडवू शकतात

Editorial

लोकसभा निवडणूकीचा महायज्ञ ४४ दिवसांनी थंड झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होतोय. भाजप स्वत: ४०० हून अधिक दावे करतायेत. मात्र प्रादेशिक पक्ष भाजपसाठी अडचणीचे ठरु शकतात पाचत अशी राज्येत आहेत जिथं प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. ज्यामुळे भाजपची अडचण होवू शकते. या राज्यांमध्ये भाजपची काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाशी थेट स्पर्धा नाही. या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांकडून कडवी टक्कर मिळतीये. याच पाच राज्यांतील कामगिरीच्या आधारे भाजपचे भवितव्य ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीही विजयाचा दावा करत आहे.

ही पाच राज्ये चर्चेत

राजकीय विश्लेष्कांच्या मते, भाजप पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, ओडिशा आणि महाराष्ट्र या ५ राज्यांमध्ये कडवी टक्कर देतो आहे. या ५ राज्यांवर भाजपचे नियंत्रण निसटण्याची भीती आहे. कारण इतर ठिकाणी एकतर भाजप पूर्णपणे आघाडीवर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. या ५ राज्यांतील १६५ जागाच भाजपचे भवितव्य ठरवतील. २०१९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे मूल्यमापन केले, तर ज्या राज्यांमध्ये भाजपची काँग्रेसशी थेट लढत होती, तिथे भाजपला विजय मिळाला. तेथे खूप फायदा आहे. उदाहरणार्थ, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अशा राज्यांतील सर्व १३८ जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, २०१४ च्या निवडणुकीत १३८ पैकी १२१ जागा जिंकल्या होत्या.

१. पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये भाजपची लढत थेट सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला येथे तृणमूलकडून चुरशीचा सामना करावा लागला होता. २०१९ ला तृणमूलला २२ जागा मिळाल्या. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळीही बंगालवर बरेच लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे येथे चुरशीची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे.

२. बिहार

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येथेही भाजपची स्पर्धा प्रादेशिक पक्ष आरजेडीशी आहे. गेल्या वेळी भाजपने येथे ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी मोठ्या सक्रियतेने निवडणुकीची कमान हाती घेतली. त्यामुळे भाजपला येथे मागील कामगिरीची पुनरावृत्ती करणं कठीण जाणारंय. यावेळी भाजपला जेडीयूचा पाठिंबा मिळाला आहे. तरी मुख्यमंत्री नितीश कुमार ज्या प्रकारे बाजू बदलत आहेत, त्यामुळे जेडीयूचे मतदार एकसंध राहणं कठिण आहे.

३. महाराष्ट्र

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये एनडीएने ४१ जागा जिंकल्या होत्या. भाजपने २५ जागांवर निवडणूक लढवली पैकी २३ जागा जिंकल्या. त्याचवेळी त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवून १८ जिंकल्या. आता परिस्थिती बदलली आहे. यावेळी भाजपसोबत महायुती आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आहे. महायुतीची लढत काँग्रेस असलेल्या महाविकास आघाडीशी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आहे. अशा स्थितीत मतदारांचा कौल कुणाला जाईल हे सांगणं अवघड होणारंय.

४. आसाम

आसाममध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकूण १४ जागांपैकी ९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपने आसाममध्ये ७ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आसाममधील लढा कठीण मानला जातोय. इथं नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) मोठा मुद्दा बनत आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटही तिथे निवडणूक लढवत आहे. त्यामुळं निवडणूक चुरशीची बनलीये.

५. ओडीसा

ओडीसात भाजपची सत्ताधारी बीजेडीशी थेट लढत आहे. २०१९ मध्ये, भाजपने बीजेडीसोबत युती केली होती, जेव्हा ओडीसामध्ये लोकसभेच्या एकुण २१ जागा आहेत. पैकी भाजपने ८ तर बीजेडीने १२ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला अवघ्या १ जागेवर समाधान मानावं लागलं. सध्या पटनाईक आणि मोदींमध्ये बेबनाव आहे. तो वेळेत दुरुस्त न झाल्यास भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

0 Comments

No Comment.