मेधा पाटकर यांच्याही मागे लागली ईडी

Editorial
Spread the love

प्रसिद्ध   सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याही मागे ईडी लागली आहे.  नंदुरबार जिल्ह्यामध्ये  ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या मेधा पाटकर यांच्याविरोधात ईडीने तक्रार दाखल  केली आहे. ह्या वृत्ताला  मेधा पाटकर यांनी दुजोरा दिला आहे. गाजियाबाद भाजपाचे नेते  संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केलीय. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता.

                  मेधा पाटकर म्हणाल्या, आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची आहे. आमच्यासारख्या जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे. समोर आलाय. आमच्यावर जो आरोप लावण्यात आलाय तो धादांत खोटा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी असं दाखवलंय की २० लोकांकडून एकच राशी आम्हाला एकाच दिवशी मिळाली. पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाही. ही राशी कुठे मिळाल्याचंही आम्हाला आढळलेलं नाही.

           माझगाव डॉक या सार्वजनिक  उद्योगाने नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जी राशी दिली होती त्याही बद्दल शंका कुशंका उपस्थित केल्यात. प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला जो सहयोग दिला तो भूतपूर्व जिल्हाधिकारी, नंदूरबार यांनी केलेल्या शिफारशीवरुन दिला. पण त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाऊंट्स, त्याचे ऑडिट, त्याचे रिपोर्ट सर्व काही माझगाव डॉकला प्रस्तुत केलं गेलं. त्यांनी मुल्यांकनही केलंय. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये याचा उल्लेख आहे,” असं पाटकर यांनी सांगितलंय.  पाटकर यांचा मामला स्वच्छ आहे तर मग  ईडीने कुठल्या आधारे  पाटकर यांच्या मागे लागायचे योजिले हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ईडीच्या विश्वासार्हतेवर अशाने प्रश्नचिन्ह लागू शकते.

 166 Total Likes and Views

0 Comments

No Comment.