राज ठाकरे मास्क घालत नाहीत हे प्रशासनाला चालते का?

Editorial News

करोनासंबंधीचे नियम  अतिशय   कडक आहेत. प्रत्येकाने   तोंडाला मास्क लावला पाहिजे, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे  असे हे नियम सांगतात. अनेक लोक हे नियम पाळत  आहेत. ज्येष्ठ साहित्यिक  श्रीपाद भालचंद्र जोशी गेल्या एक वर्षापासून  जिन्याखाली उतरलेले नाहीत. असे अनेक आहेत. पण  आपण रस्त्यावर अनेक जण मास्क नसलेले पाहतो.  प्रशासन त्यांना दंडही ठोठावत आहे. पण मनसेचे  सुप्रीमो राज ठाकरे यांचे काय करायचे? राजसाहेब अजिबात मास्क घालत नाहीत.  मास्कशी  त्यांचे काय वैर आहे  कळायला मार्ग नाही. पण ते मास्क लावत नाहीत. मागे मुंबईत मराठी दिनाच्या समारंभाला  मास्क न लावताच ते आले होते.  पत्रकारांनी त्यांना छेडले तेव्हा  त्यांनी ‘मी मास्क लावत नाही’ असे बाणेदार उत्तर दिले होते.  आज नाशिकच्या दौऱ्यावर  ते  आले  तेव्हाही मास्क नव्हता. त्यांच्या स्वागताला आलेले माजी महापौर  अशोक मुर्तडक यांच्या चेहऱ्याला मास्क होता.    राजसाहेबांनी त्यांना तो काढायचा सूचक इशारा केला तेव्हा कार्यकर्ते चाट पडले.  नाशिकमध्ये विनामास्क फिरणाऱ्याला   एक हजार रुपये दंड आहे.  नाशिक महापालिका प्रशासन आता काय कारवाई करते याकडे  लक्ष राहणार आहे.               करोनाचे खूप सारे नियम आहेत.  गर्दी करू नका, लग्नाला ५० च्या वर लोक नकोत असे प्रशासन सांगते.  लग्नाच्या गर्दीवर  अनेक जागी  कारवाई झाली आहे. पण  सेलिब्रिटीना सारे गुन्हे  माफ आहेत असे दिसते.  भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या  लग्नाला  देवेंद्र फडणवीस यांच्यापासून  खूप सारे व्हीआयपी  नाशकात दाखल झाले आहेत.  मंत्रीसंत्रीच गर्दी करीत असतील तर मग  जनता कशी मागे राहील?  विचित्र मानसिकतेमुळे  राज्यात जागोजागी करोनाचे नियम धाब्यावर  बसवताना  पाहायला मिळत आहे.  करोनाचे आकडेवारी  वाढत असताना हे चित्र  चिंता वाढवणारे आहे.



Hi MAHARASHTRA

Please Subscribe Hi Maharashtra News Channel on You Tube and visit our www.himaharashtra.com​ website For more update about latest news, news analysis and Political Opinion,

Subscribe, Fallow and Like us on-
Website- https://www.himaharashtra.com​
Facebook- https://www.facebook.com/himaharashtranews
Twitter- https://twitter.com/himaharashtra
Youtube – https://www.youtube.com/channel/UCVX4MumhDHBhYzKBykTtCrg

#himaharashtra #news #analysis #Political_Opinion

Mail us for any suggestion
himaharashtra@gmail.com

0 Comments

No Comment.