मनसुख बुडाला की त्याला बुडवले?

Editorial News
Spread the love

आपल्याकडे माणसं  मरतात, मारली जातात, काही आत्महत्या करतात,   सेलिब्रिटी असेल तर  चर्चा होते.  पोलीस तपासात  किती जणांना मरणोत्तर न्याय मिळतो? हा प्रश्नच आहे.  अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईतला संशयास्पद मृत्यू  थेट  बिहारमध्ये गाजला. राजपूतला ड्रग पुरवण्याच्या  आरोपात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती  अडकली.  पूजा चव्हाण ह्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यामुळे   शिवसेनेच्या एका मंत्र्याला घरी बसावे लागले.  आणि आता ज्या माणसाच्या नावातच  ‘सुख’ आहे त्या मनसुखचा  मृत्यू  गाजतो आहे. प्रसिध्द  उद्योगपती मुकेश  अंबानी यांच्या  निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी  जिलेटीन कांड्यांनी भरलेली कार सापडली होती.  या घटनेचा तपास चालू असतानाच, त्या कारचे मालक  मनसुख हिरेन   यांचा मृतदेह   मुंब्रा येथील  रेतीबंदरच्या खाडीत सापडल्याने  खळबळ आहे.  मृतदेह काढण्यात आला तेव्हा   त्यांच्या चेहऱ्यावर मास्कखाली ५-६ रुमाल  मिळाल्याने अंबानी बंगल्याबाहेरील कारचे   गूढ  आणखी गडद झाले आहे.  मनसुखची पत्नी म्हणते,  माझा नवरा पट्टीचा पोहणारा होता. तो कसा बुडेल? ही हत्याच आहे.   असे काय रहस्य त्या कारमध्ये दडले आहे, की  एकाचा जीव गेला, आणखी कितींचा जीव जाईल सांगता येत नाही.

             मनसुखचे  कार डेकोरेशनचे  दुकान होते. कुठल्या लंदफंदमध्ये तो नसायचा असे त्याच्या गल्लीतले व्यापारी सांगतात.  मग त्याला  कुणी का संपवले? काहीतरी गडबड आहे.   तपासाच्या नावावर पोलिसांनी चालवलेल्या छळामुळे ते टेन्शनमध्ये आले होते का? एवढे रुमाल त्याने तोंडात कसे दाबले असतील?   पोस्ट मार्टेममध्ये  त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट लिहिलेले नाही.  त्याच्या मोबाईलमधला सीडीआर डाटा   काढून  त्यांना शेवटचा फोन कुणी केला  ते समजू शकते.   काल  हा विषय  आला तेव्हा  देवेंद्र फडणविसांनी  सचिन वाझे   ह्या पोलीस अधिकाऱ्याचे  नाव घेतले होते. वझे एनकाउन्टर  स्पेशालीस्ट आहेत. अर्नब गोस्वामीला यांनीच उचलले होते.  काय भानगड आहे?   भाजपला रस आहे. तुम्ही लिहून ठेवा. पूजाचा मामला पेटवला तसा  भाजप   हा मृत्यूही  पेटवणार.Hi MAHARASHTRA

Please Subscribe Hi Maharashtra News Channel on You Tube and visit our www.himaharashtra.com​ website For more update about latest news, news analysis and Political Opinion,

Subscribe, Fallow and Like us on-
Website- https://www.himaharashtra.com​
Facebook- https://www.facebook.com/himaharashtranews
Twitter- https://twitter.com/himaharashtra
Youtube – https://www.youtube.com/channel/UCVX4MumhDHBhYzKBykTtCrg

#himaharashtra #news #analysis #Political_Opinion

Mail us for any suggestion
himaharashtra@gmail.com

 193 Total Likes and Views

0 Comments

No Comment.