क्रिकेटच्या देवाला करोना

Analysis News

क्रिकेटचा देव मानल्या जाणार  सचिन तेंडुलकर याला करोना झाला आहे. फस्त बोलीन्ग्शी झुन्झ्णारा सचिन आज  करोनाशी झेन्ज्तोय.  ही बातमी पसरताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीसाठी देवेकडे प्राथना सुरु केल्या आहेत.  सहा दिवसांपूर्वीच तो  पॉझिटीव निघाला होता.  घरी सगळ्यांची टेस्ट निगेटिव आली. हाच एक पॉझिटीव निघाला.  त्यानंतर त्याने घरीच विल्गीकारणात राहणे पसंत केले होते. पण आज  डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तो रुग्णालयात भरती झाला.  ‘आपली तब्येत चांगली आहे. लवकरच घरी जाऊ’ असे त्याने स्वतःहून ट्वीट केले.

           नुकताच सचिन रोड  सेफ्टी वर्ल्ड सेरीजमध्ये  रायपुरमध्ये  खेळला होता.   ह्या स्टेडीयममध्ये   प्रेक्षकांना परवानगी  देण्यात आली होती.  त्याचा परिणाम म्हणा किंवा आणखी काही कारण म्हणा,  मुंबईला परतल्यानंतर सचिनला  करोनाची सोमय लक्षणे जाणवू लागली होती. सचिनच नव्हे तर  इथे खेळणारे युसुफ पठाण, इरफान पठाण, बद्रीनाथ  ह्या खेळाडूंचीही  करोनाने विकेट घेतली.  करोना लहान मोठ्यांचा विचार करीत नाही असेच दिसते.  रणबीर कपूर, आलीय भट्ट  ह्या सिने कलावंतांनाही  करोनाने   बिछाना पकडायला  भाग पडले आहे.

 देशात भयंकर  चित्र आहे.   शुक्रवारी करोनाचे  ८१ हजार नवे पेशंट निघाले.   साडे चारशे जणांचा मृत्यू झाला.   आज देशात  करोनाचे  तब्बल ६ लाख सक्रीय पेशंट  आहेत. करोनाने आतापर्यंत  देशात  १ लाख ६३ हजार व्यक्तींचा  घास घेतला आहे.   आपल्या राज्यात गुरुवारी   ४३ हजार नवे पेशंट निघाले,  २५० करोनाबाधितांचा मृत्यू झाला.  आपल्या राज्यात आजच्या घडीला  २८ लाख पेशंट आहेत. हा आकडा थांबायला तयार नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.  नागपूर जिल्ह्यात तर आठवडाभरापासून    दररोज  ४० हेऊन अधिक करोनाबाधित दम तोडत आहेत.  गुरुवारी ६० लोक मेले. तेव्हा स्वतःला सांभाळा.  आपल्याला करोना होणार नाही ह्या भ्रमातून बाहेर या.  आणि काळजी घ्या.  यापेक्षा आणखी काय बोलू शकतो.

0 Comments

No Comment.