यवतमाळ व अमरावतीमध्ये करोनाचा नवा अवतार

Editorial News Others
Spread the love

                करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  विदर्भातील  यवतमाळ, अमरावती आणि अकोला शहरांमध्ये  चिंता करावी असे वातावरण आहे.  यवतमाळ एका आणि अमरावतीच्या  चार रुग्णांमध्ये  करोनाचा नवा स्ट्रेन  सापडल्याने चिंता वाढली आहे.   मात्र हा  विषाणू युकेतला नाही,  भारतीय आहे  अशी माहिती मिळाली.  त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही . पण  हा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने  कडक निर्बंध  लावले आहेत. ह्या जिल्ह्यांमध्ये   नमुने घेण्याचे प्रमाण  २० पटीने  वाढवण्यात येत आहेत.

                करोनाने सामान्यांना त्रस्त केले आहे.   मंत्र्यांनाही सोडलेले नाही.  राज्याचे  चार मंत्री  ह्या दोन दिवसात कोरोनाने  बाधित झाले आहेत.  करोनाशी राज्यभर लढा  उभारणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना  करोना झाल्याची माहिती आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू  हेही पॉजिटिव्ह निघाले आहेत.  राष्ट्रवादीचे नेते   एकनाथ खडसे  यांना तर  दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे.

 162 Total Likes and Views

0 Comments

No Comment.