करिना कपूरला झाला पुन्हा मुलगा

Analysis Entertainment News
Spread the love

          सिने अभिनेत्री करिना कपूर हिला  पुन्हा मुलगाच झाला  आहे.  मुंबईतील ब्रीच कांडी रुग्णालयात आज रविवारी सकाळी   करिना बाळंत  झाली. बाळ-बाळंतीण  सुखरूप आहेत.  सिने अभिनेता सैफ अली खान याच्याशी करीनाचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना  तैमुर नावाने   चार वर्षाचा  मुलगा आहे.  

                 घरात ह्या नव्या पाहुण्याच्या  येण्याने  कपूर घराणे   भलतेच खुश आहे.   करिना ही रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची मुलगी आहे.   रणधीर-बबिताने रुग्णालयात जाऊन  आनंद व्यक्त केला.  दोघांनाही आजोबा-आजी झाल्याचा आनंद आहे.

             सैफचे हे दुसरे लग्न आहे.   पहिल्या लग्नात अमृता सिंग हिच्यापासून सैफला   एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी सारा अली खान ही १२ वर्षांची आहे.

 194 Total Likes and Views

0 Comments

No Comment.