करोनाचे पेशंट करताहेत आत्महत्या

Analysis Lifestyle News
Spread the love

करोना झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या सुरु झाल्या आहेत.  करोनाने माणसे मरत होती. पण आता  करोना झाला म्हणून लोक स्वतःला संपवून घेत आहेत.  हे सारेच धक्कादायक आहे.  करोना  नैराश्य  वाढवत आहे. करोंच्या बातम्याही  निराशाजनक असतात. आज इतक्या पेशंटची भर पडली, इतके दगावले, गंभीर परिस्थिती, लॉकडाउन वाढवणार आशा बातम्यांचा   रोज रतीब सुरु आहे.   जगात चांगले काही घडतच नाही  असे एकूण वातावरण टीव्ही पाहिल्यावर दिसते.   पेशंटची हिंमत वाढवली नाही तर  हे मोठेच संकट  उभे राहू शकते. 

 नागपुरात करोना उपचार गेह्त असलेल्या दोन रुग्णांनी  घाबरून गळफास लावून घेतला.    यातील एक रुग्ण ८१ वर्षांचा होता.  कोव्हिड वार्डात तो भारती होता. काळ सायंकाळी तो  बाथरूममध्ये गेले. तिथे  तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्कचा  पाईप   पंख्याला अडकवून  त्याने गळफास घेतला. ६८ वर्षाच्या दुसऱ्या एक पेशंटने घरीच  गळफास घेतला. पुण्यात एका इंजिनिअर तरुणाने  गळफास गेह्तला. नोकरी गेल्याने  तो खचला होता.    सोन्यासारखे आयुष्य  लोक स्वतःहून संपवत आहेत.    कुठेतरी त्यांना हिंमत  दिली पाहिजे.  करोनाचा उपचार घेत असलेल्या पेशंटला  कुणाला भेटता येत नाही.  डॉक्टर आणि इतर कर्मचारीही पीपीई  किट घालूनच असतात.  उदास वातावरणामुळे मृत्यूचे भाय  आणखी वाढते.  घरी उपचार घेणाऱ्यांची मानसिक अवस्था काही वेगळी नसते.  मुले नोकरीसाठी  बाहेर असलेल्या ज्येष्ठांना  मानसिक आधार देण्याची मोठी गरज आहे.  एकटेपणा हा माणसाचा मोठा शत्रू आहे.  त्याला जवळपास भटकू देऊ नका.   अधिकाधिक लोकांशी बोला. मन गुंतवून ठेवा. मन भटकू देऊ नका.  सकारात्मक विचार करूनच आपण  करोनाला हरवू शकू.

 261 Total Likes and Views

0 Comments

No Comment.