भारतात लाॅक डाऊनची गरज काय ?

Analysis News

भारतात ३३ कोटी देव असताना लाॅक डाऊन कशासाठी ?
भारतातली जनता ८०% देव भोळी आहे… भारतात देव नवसाला पावतात! संकटकाळी धाऊन येतात !भारतात सुखकर्ते /दुखहर्ते भारतात असतांना लाॅक डाऊन येवढे दिवस का. ? भारतातले ८०% टक्के लोक आस्तिक आहेत. भारतात देव जर नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन , बिना आई /बाप नसतांना जन्म घेतात ! हा चमत्कार भारतातच होत असतांना भारतात लाॅक डाऊन येवढे दिवस का ? ‌
भारतात भोंदु बुवा, बाबा ,पंडीत, फकीर ,फादर , साधू , भानामती जकीन /चेटकीण जागेवाला, गाववाला, भगत,आम्मा ,टम्मा भविष्यकार‌ असे बरीच देवांची दलाल फौजअसतांना भारतात लाॅक डाऊन का. ?

भारत हा अंधश्रध्देने, चमत्काराने,
भानामतीने, नवसाने,व्रतवैकल्याने ,उपास ,तापासाने अंधविश्वासाने, अंधभक्तीने भरलेला असताना. लाॅक डाऊन का. ?
भारतात या सर्व गोष्टी उपलब्ध असतांना कोरोना व्हायरस संक्रमणाच संकट दुर का होत नाही. .. का. ? ??
ही भारतातली कपोलकाल्पनिक फौज कुठे तरी कमी पडते का..,…? . की. कुठे चिडी /चुप दडी मारून आहे ? ‌ )
भारतात होम हवन महामृत्युंजय‌.. महायज्ञ …पारायण. ..जागरण .ऊरूस.‌ यात्रा भ़ंडारा . एकादशी /दुवादशी. चतुर्थी . सप्ता * हप्ता * अशी बरीच सोंग/ ढोंग केली जातात..त्याच्यातच सत्य नसलेला . सत्यनारायण* *पण घातला जातो. मग भारतात लाॅक डाऊन कशाला ? का. ?
की. याच्यात ‌काहीच तथ्थ नाही !!! या सर्व भंप्पक कथा कल्पना/ काल्पनिक रंगवलेली.. चित्र / विचित्र तर नाही ना ? .असच कुठेतरी वाटत ?
..की विशीष्ट लोकांचे पोट भरू धंदे…. की मानव जातीला मानसीक गुलाम बनवुन, मेंदु गोठवण्याचा जाणून बुजून प्रकार / प्रयत्न आहे असेच म्हणावे लागेल.. अंधश्रध्दा आणि अंधभक्ती हे माणसाची बुध्दी गहाण ठेवुन माणसाचा विकास खुंटणारी विषारी ठिकाण आहेत. . हेच खरे! . .. अखेर कोरोना संक्रमण असो या कोणतेही जिवघेणे नैसर्गिक संकट असो; मानव जातीवर येणा-या संकटाला फक्त अशा काल्पनिक गोष्टीवर विश्वास न ठेवता आपणच स्वयंदिप ..स्वंयं प्रकाशीत होऊन .स्वत:च रक्षण करून .स्वत:चा विकास स्वतःच करु शकतो‍. व , विज्ञानवादी होऊन .आत्म निर्भर बनुन .. विज्ञानावर विश्वास ठेऊनच येणा-या संकटावर मात करू शकतो हेच खरे !!! या कोरोना संक्रमण संकटानेच बरेच काही शिकवलं, दाखवुन दिलयं, फक्त आपल्या डोळ्यावरची अंधश्रद्धेची, अंधविश्वासाची,अंधभक्तीची झापड.,, काढून टाका! … खरच गरजेचे आहे! तरच अशा येणा-या संकटावर मात करून विज्ञानंवादी बनु शकतो!!

0 Comments

No Comment.