कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

Analysis Editorial Maharashtra News

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी लाट येतेय की काय अशी भीती आहे.   नियम पाळा  असे प्रशासन ओरडून सांगत आहे. पण लोक ऐकायला तयार नाहीत. मास्क न घालता लोक   लग्न, सभा समारंभाना गर्दी करत आहेत.  नागपुरात  अधिक वऱ्हाडी  बोलावणे एका  वधुपित्याला  महागात पडले.  महापालिकेने  दंड ठोठावला.   त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.    खास करून मुन्बीमध्ये  धोका वाढला आहे. विदर्भातही   रुग्णसंख्या वाढत आहे. सरकार कुठलाही धोका पत्करायला तयार नाही.  अमरावती जिल्ह्यात  येत्या रविवारी   एक दिवसाचा लॉकडाऊन  जाहीर झाला आहे.  अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही  कडक निर्बंध  लावण्यात आले आहेत.  गर्दी करणाऱ्या,  मास्क न लावता फिरणाऱ्या  व्यक्तींवर मोठी कारवाई होणार आहे.  नागपुरात तर बुधवारी एकाच दिवशी ६००  रुग्ण पॉजिटिव्ह  निघाल्याने टेन्शन वाढले आहे.  मेडिकल कॉलेजमध्ये  गेल्या आठ दिवसात  तब्बल ३५ डॉक्टर्स पॉजिटीव्ह निघाले.  करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी झालेल्या चुका   यावेळी टाळायला हव्या.  लॉकडाऊनसारखे टोकाचे उपाय टाळायला हवेत.    लॉकडाऊनमुळे     अर्थव्यवस्थेचे चाक  ठप्प होते.   गरिबांना फटका बसतो.   त्यापेक्षा  वैद्यकीय  सुविधा   वाढवून सर्वांना  सुरक्षित वावराचे नियम पाळायला   सक्तीचे केले तर   कोरोनाला  आपण रोखू शकू.  तो गेलेला नाही, जाणार नाही एवढे भान लोकांनी ठेवले तरी   मोठा  फरक पडेल.

0 Comments

No Comment.